एलपीजी सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली : व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १ ऑगस्टपासून मोठी कपात करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरात दिल्लीत २०२ रुपये, तर कोलकात्यात २०९ रुपयांची घट केली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

नव्या दरांनुसार, १ ऑगस्टपासून कोलकात्यात १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर २,८७२.५० रुपये दराने उपलब्ध होणार आहे. तर दिल्लीतही सिलिंडरच्या दरात २०२ रुपयांची कपात करण्यात आली असून व्यावसायिक ग्राहकांना याचा थेट लाभ मिळणार आहे.

विशेष म्हणजे, सलग दुस-या महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. यापूर्वी १ जुलैपासून दिल्लीतील १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरात १८३.५० रुपयांची कपात करण्यात आली होती. त्या बदलानंतर दिल्लीतील किरकोळ किंमत २,९३० रुपये झाली होती.

दरम्यान, तेल विपणन कंपन्यांनी १ जुलैपासून ५ किलो फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही १३ रुपयांची कपात केली होती. या सुधारणेनंतर दिल्लीमध्ये ५ किलोचा एफटीएल सिलिंडर ८०८.५० रुपये दराने उपलब्ध आहे.

व्यावसायिक वापरासाठी असलेल्या निळ्या एलपीजी सिलिंडरचे दर तेल विपणन कंपन्यांकडून सातत्याने कमी केले जात असले, तरी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर मात्र ‘जैसे-थे’च राहिले आहेत. म्हणजेच, घरांमध्ये वापरल्या जाणा-या १४ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
घरगुती गॅस सिलिंडरचे दर ७ जून रोजी निश्चित केलेल्या पातळीवरच कायम आहेत. परिणामी, दिल्लीमध्ये १४ किलोचा एलपीजी सिलिंडर ९४२ रुपयांना उपलब्ध आहे, तर कोलकातामध्ये त्याची किंमत ९६८ रुपयांवर स्थिर आहे. याव्यतिरिक्त, १४ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत मुंबईत ९४१.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ९५७.५० रुपये इतकी आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news