लातूर : वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल येथील प्रसिद्ध श्वसन विकार व छातीविकार तज्ज्ञ डॉ. रमेश भराटे यांचा ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये गौरव करण्यात आला आहे. डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी कार्यरत असलेल्या टी्िररँी ए-छीं१ल्ल्रल्लॅ ढ१्र५ं३ी छ्रे्र३ी,ि मुंबई यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या विक्रमातील योगदानाबद्दल त्यांना हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
या विक्रमाची नोंद छं१ॅी२३ ऊ्रॅ्र३ं’ उङ्मे४ल्ल्र३८ ढ’ं३ाङ्म१ेह्याङ्म१ ऊङ्मू३ङ्म१२ म्हणून करण्यात आली आहे. प्रमाणपत्रानुसार, ७ जानेवारी २०२६ रोजी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ८,००,०४१ डॉक्टर, वैद्यकीय व्यावसायिक आणि सहयोगी आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक नोंदणीकृत होते. या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण, अक-आधारित प्रॅक्टिस सहाय्य, वैज्ञानिक संवाद, डिजिटल आरोग्यविषयक सुविधा तसेच विविध वैद्यकीय शाखांमधील ज्ञानाची देवाणघेवाण आणि सहकार्याला चालना दिली जाते. या विक्रमाची अधिकृत पुष्टी २५ जुलै २०२६ रोजी करण्यात आल्याचे प्रमाणपत्रात नमूद आहे.
















