एसटीच्या बसेस वेळेवर न पुरविणा-या कंपनीचे कंत्राट रद्द करा

मुंबई : प्रतिनिधी
एसटीच्या ताफ्यात आतापर्यंत फक्त ६५ ई बस दाखल झाल्या आहेत, परंतु अद्याप या बसेस वेळेवर पुरवल्या जात नाहीत. यामुळे श्रीरंग बरगे यांनी कंत्रादाराचे कंत्राट रद्द करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, एसटी महामंडळाने ५१५० विजेवरील बस कंत्राटी पद्धतीने घेण्याचा करार एका कंपनीशी केला असून सदर कंपनी दर महिन्याला २१५ बसेस देणार होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बसेसचे उद्घाटनही १३ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आले. परंतु मार्च ते ऑगस्ट २०२४ या महिन्यात पुरवठादार कंपनीकडून एसटीला फक्त ६५ ई बस मिळाल्या असून कराराचा भंग करणा-या कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात यावे, व या गाड्या यापुढे सुद्धा वेळेवर येतील अशी खात्री नसल्याने भाडे तत्त्वावरील गाड्या न घेता स्व मालकीच्या नवीन गाड्या खरेदी कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

आतापर्यंत ताफ्यात दाखल झालेल्या ई बसची संख्या ठाणे विभाग २४, नाशिक विभाग १०, नागपूर विभाग २६, सातारा विभाग ५ इतकी असून महामंडळाची प्रवासी संख्या कमालीची वाढली असून गाड्या कमी पडत आहेत.

त्याचप्रमाणे ई बस कंपनीला प्रति बस २० लाख रुपये इतकी सबसिडी सरकार देणार असून ६५० कोटी चार्जिंग सेंटरसाठी खर्च होणार आहेत. एकूण १७२ ठिकाणी चार्जिंग स्टेशन बांधण्यात येणार असून त्यापैकी काही चार्जिंग सेंटर पूर्ण झाली आहेत. महावितरण कंपनीला १०० कोटी रुपये इतकी अनामत रक्कम भरण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे रस्ता खोदणे व पूर्ववत करण्यासाठी महापालिका, नगर परिषदा व नगरपालिकांना २० ते २५ कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात आली आहे. चार्जिंग स्टेशनवर ३९० कोटी रुपये खर्च करण्यात येत असून ९० कोटी बांधकामावर खर्च करण्यात आले आहेत. गाड्या वेळेवर न आल्याने सरकारच्या पैशाचा नाहक अपव्यय होत असून जोपर्यंत निश्चित केलेल्या वेळेत गाड्या येत नाहीत तोपर्यंत चार्जिंग स्टेशनसाठी गुंतवलेल्या रकमेचे व्याज रक्कम कंत्राटदार कंपनीकडून वसूल करण्यात यावे अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

एकंदर सर्व परिस्थिती पाहता महामंडळाकडे प्रवाशांसाठी गाड्या कमी पडत असून त्यांची गैरसोय होत आहे. या सर्व प्रकाराला गाड्या पुरवणारी कंपनी असून सदर कंपनीवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच एसटीने यापुढे भाडे तत्त्वावरील गाड्या न घेता स्व-मालकीच्या नवीन गाड्या खरेदी कराव्यात व त्यासाठी सरकारने निधी प्राप्त करून द्यावा, अशी मागणीही श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26

Latest news