एसटीच्या स्मार्ट कार्डला उत्स्फूर्त प्रतिसाद; १ कोटींहून अधिक नोंदणी

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्डला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १२ ऑगस्टपर्यंत राज्यात तब्बल १ कोटी १ लाख ७३ हजार ८३८ प्रवाशांनी ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून, त्यापैकी ६४ लाख ९१ हजार ६५ कार्डे सक्रिय झाली आहेत.

‘एनसीएमसी’स्मार्ट कार्डच्या माध्यमातून एसटी प्रवासातील तिकीट व्यवहार अधिक सुलभ आणि कॅशलेस करण्याच्या दिशेने महामंडळाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. पहिल्या टप्प्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात येत आहे. येत्या १ सप्टेंबरपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘एनसीएमसी’स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ‘एनसीएमसी’स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी ही केवळ प्रवासाची सेवा नसून महाराष्ट्राच्या जनजीवनाशी जोडलेली लोकवाहिनी आहे. या ‘लालपरी’चा प्रवास काळानुरूप अधिक आधुनिक, डिजिटल आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘एनसीएमसी’स्मार्ट कार्डला मिळणारा प्रतिसाद हा प्रवाशांचा या डिजिटल परिवर्तनावरील विश्वास दर्शवितो. भविष्यात एसटीच्या सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून प्रवाशांचा वेळ वाचविणे आणि त्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

येत्या १५ ऑगस्टपासून राज्यभरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट कार्डच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत जाऊन एसटीचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ‘एनसीएमसी’ कार्डसाठी इतर कोणत्याही ठिकाणी नोंदणी करू नये, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. प्रवाशांना ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड अधिकृत एसटी आगार, बसस्थानक तसेच अधिकृत एजंट नेटवर्कच्या माध्यमातून मिळविता येणार असून, त्याच माध्यमातून कार्ड रिचार्जची सुविधाही उपलब्ध आहे.

दरम्यान, प्रवाशांचा विश्वास हीच एसटीची खरी ताकद आहे. डिजिटल सुविधांचा स्वीकार करून प्रवाशांनी एसटीच्या आधुनिकतेच्या प्रवासाला दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. येत्या काळात ‘एनसीएमसी’स्मार्ट कार्डचा वापर आणखी व्यापक करून ‘प्रवासी प्रथम’ या भूमिकेतून एसटीच्या सेवांना नवे डिजिटल रूप देऊ, असेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|लातूरमध्ये दुष्काळाची छाया; सोयाबीन पिकाची पाहणी करत माजी आमदार धीरज देशमुख आक्रमक
03:57
Video thumbnail
Latur|सलगऱ्यात ९२ फुटी भव्य अस्थी विसर्जन घाट! देविदास गुरधाळे मामा यांच्या स्मरणार्थ मोठा प्रकल्प
04:51
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
19:07
Video thumbnail
Jalkot|घागरदऱ्यात हर हर महादेवचा जयघोष; दर्शनासाठी हजारोंची गर्दी
01:40
Video thumbnail
BREAKING : लातूरकरांनो सावधान! मांजरा धरणाची पाणीपातळी चिंताजनक!
02:23
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये शिवसेना उबाठाचा सरकारविरोधात एल्गार! गांधी चौकात होणार महाआंदोलन
04:20
Video thumbnail
Nanded|पाऊस नाही, पिके करपली! शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५० हजार मदतीची मागणी
01:44
Video thumbnail
Nanded|हातात लग्नाचा बॅनर घेऊन तरुण टॉवरवर! कौटुंबिक त्रासाचा आरोप | लोह्यात खळबळ
00:46
Video thumbnail
Nanded|गणरायाचं विसर्जन करायचं कुठे? नांदेडमध्ये नदी-खदानी कोरड्या | महापालिकेसमोर संकट
02:26
Video thumbnail
Latur|खरगे यांच्या अवमानाविरोधात पुरोगामी संघटना एकवटल्या! गांधी चौकात निषेध सभा
03:14
Video thumbnail
Latur|जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तरुण टॉवरवर! रेणापूरच्या कोरेगावातील आंदोलन
02:04
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13

Latest news