23.7 C
Latur
Friday, July 11, 2025
Homeलातूरएस. टी. महामंडळ आगाराची शिवशाही की तानाशाही?

एस. टी. महामंडळ आगाराची शिवशाही की तानाशाही?

वलांडी : हसन मोमीन
निलंगा-उदगीर राज्यमार्गावर एस.टी. महामंडळ आगारातून सुरु करण्यात आलेल्या शिवशाही बससेवेबाबत प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शिवशाहीच्या नावाखाली सुरू असलेल्या गाड्या प्रत्यक्षात भंगार अवस्थेत असून प्रवास करताना त्रासाचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे अशा खराब दर्जाच्या बससाठी प्रवाशांना वाढीव दीडपटीने तिकीट दर भरावा लागत असल्याने हे आर्थिक शोषण असल्याचा तसेच  तानाशाही सुरू असल्याचा संताप प्रवाशांतून व्यक्त केला जात आहे.
सदर मार्गावर सुरू असलेल्या बसेस शिवशाही असल्या तरी पुर्वी प्रमाणे या गाड्यांमध्ये आता कोणतीही सुविधा उरल्या नाहीत. शीट खिळखिळ्या, गाडीचा आवाज कर्णकर्कश, दरवाजे सताड उघडे आणि एसी केवळ नावालाच असून त्या प्रवासादरम्यान बंद ही पडत आहेत. तसेच या गाड्या प्रत्येक थांब्यावर थांबा देण्यात आल्याने लांब पल्ल्याचा प्रवास आणखी त्रासदायक ठरत आहे. निलंगा-उदगीर मार्गासाठी सामान्य गाडीचे तिकीट ११२ रुपये असताना, शिवशाहीसाठी १७० रुपये आकारले जात आहेत. निलंगा-वलांडी मार्गावरही तिकीट दरात २४ रुपयांचा फरक आहे. शिवाय, प्रत्येक स्टेजला ५ रुपये अधिक मोजावे लागत असल्याने प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे. विशेष म्हणजे अशा खराब दर्जाच्या बससाठी प्रवाशांना वाढीव दीडपटीने तिकीट दर भरावा लागत असल्याने हे आर्थिक शोषण असल्याचा तसेच  तानाशाही सुरू असल्याचा संताप प्रवाशांतून व्यक्त केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR