27.2 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeलातूरएस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) कार्यकारिणीची बिनविरोध निवड

एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) कार्यकारिणीची बिनविरोध निवड

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) विभागीय कार्यशाळा लातूरची सन २०२६ ची सर्वसाधारण सभा व कार्यकारिणी बैठक दि. ११ फेब्रुवारी रोजी आई तुळजाभवानी एस. टी. कर्मचारी मंदिर येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाली. या सभेत कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी अजय कोथिंबीरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय सचिव विजयकुमार बनसोडे, राज्य सहसचिव इस्माईल पठाण, तसेच विभागीय कार्याध्यक्ष जयराम गर्जे यांची उपस्थिती लाभली. इंटक संघटनेच्या शीर्ष नेतृत्वाच्या सक्षम, संघर्षशील व कामगारहिताच्या भूमिकेवर विश्वास ठेवून काही कर्मचा-यांनी जाहीर प्रवेश केला. त्यात जनसंघातून अनिल पिडगे, सचिन संपते, गजानन गिरी, सेवाशक्ती संघर्ष संघटनेतून ज्ञानेश्वर रेयनुळे, गजानन कानगुले यांचा समावेश आहे.
सन २०२६ साठी बिनविरोध निवड झालेल्या कार्यकारिणीत अध्यक्ष  अजय कोथिंबीरे, सचिव सुषेमन गायकवाड, कार्याध्यक्ष खंडेराव माडीबोने यांचा समावेश आहे.  या सभेला दिलीप पळसे, बाळासाहेब सोनकांबळे, बालाजी चिघळे, नागेश चौहान, श्रीधर बनसोडे, शंभूराज मुगळे, राहुल परतवाघ, पंकज सरवदे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR