मुंबई : प्रतिनिधी
ऑक्टोबर महिन्याला सुरूवात झाली. मान्सूनने अद्याप तरी पूर्णपणे निरोप घेतलेला नाही. अजूनही काही भागांत रिमझिम पाऊस बरसतो आहे. गेल्या महिन्यात राज्यातील मराठवाड, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले. यामुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. उभी पिकं डोळ्यांसमोर वाहून गेली. मात्र, परतीचा पाऊस अजूनही पूर्णपणे गेलेला नाही. १२ ऑक्टोबरला परतीच्या पावसाला सुरूवात होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे दिवाळीत पाऊस बरसेल की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबईतील अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. गोवा, कोकण, दक्षिण किनारी गुजरात आणि सौराष्ट्र प्रदेशात मुसळधार पाऊस पडला. मुंबईच्या दक्षिणेकडील भागांना याची सर्वाधिक फटका बसला. मात्र, पाऊस कधी जाणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हवामन खात्याच्या अंदाजानुसार मुंबई आणि आसपासच्या भागात २ ऑक्टोबरपर्यंत पाऊस बरसणार नाही. मात्र, त्यानंतर परतीचा पाऊस पुन्हा बरसू शकतो. खरंतर २९ सप्टेंबर रोजी पाऊस थांबण्याची अपेक्षा होती. मात्र, अजूनही काही भागात तुरळक पाऊस बरसत आहे. २०२० साली पाऊस ८ ऑक्टोबरपर्यंत बरसत होता. तर, २०२४ साली पाऊस १५ ऑक्टोबरपर्यंत बरसत होता. या वर्षीही हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
मुंबईला झोडपून काढले
मुंबई आणि आसपासच्या भागात मान्सूनचा दुसरा टप्पा जोरदार राहिला. ऑगस्ट महिन्यात पावसामुळे मुंबईतील काही भागात पाणी साचलं होतं. ऑगस्ट महिन्यात मुंबईत दुप्पट पाऊस बरसला. सप्टेंबर महिन्यात ६०७.३ मिमी पावसाची नोंद झाली. तर, या महिन्यात ३४१.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
..

