Homeमहाराष्ट्रऐन लग्नसराईत चांदीच्या दरात मोठी घसरण;  सोन्याचा दर १.४६ लाखांवर

ऐन लग्नसराईत चांदीच्या दरात मोठी घसरण;  सोन्याचा दर १.४६ लाखांवर

जळगाव : प्रतिनिधी
शहरातील सुवर्ण बाजारपेठेत अनेक दिवसांपासून सोनं, चांदीच्या दरात मोठी चढ-उतार होत असून, लग्नसराई तसेच सणासुदीसाठी दागिने खरेदीच्या विचारात असलेले ग्राहक संभ्रमात पडले आहेत. सोनं आणि चांदीचे दर जोपर्यंत स्थिर होत नाही, तोपर्यंत बाजारपेठेतील उलाढाल सुरळीत होण्याची चिन्हे नसल्याने सुवर्ण व्यावसायिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आज जळगावच्या बाजारात सोन्याचे दर १,४६,५०० रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. तर चांदीचे दर हे २, ३१,००० रुपयांवर जाऊन पोचले आहेत.

आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम सोन चांदीवर झालेला पाहायला मिळतो आहे. शनिवार च्या तुलनेत जळगावमधील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी सोने आणि चांदीच्या किमती किंचित बदल झाला असून ब-यापैकी स्थिर राहिलं आहे. सलग वाढीनंतर आलेली ही स्थिरता बाजारासाठी दिलासादायक ठरली जात असून, ग्राहक आणि व्यापा-यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काल म्हणजेच रविवारी २९ मार्च रोजी सोन्याचे दर १,४६,००० होते, आणि चांदीचे दर २,३३,००० इतके होते. तर आज म्हणजेच सोमवारी ३० मार्च रोजी सोन्याचे दर १,४६,५०० इतके आहे, तर चांदीचे दर २,३३,००० इतके आहे. म्हणजेच रविवारच्या तुलनेने चांदी आज २ हजारांनी घसरली आणि सोन फक्त ५०० रुपयांनी वाढलेलं पाहायला मिळत आहे.

लग्नसराईच्या दिवसांमध्ये सराफा बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळायची. मात्र, यंदा वाढत्या किमतींमुळे बाजारपेठेत तुलनेने गर्दी पाहायला मिळते आहे. संोने-चांदीचे दर आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्य ग्राहकांमध्ये चिंता वाढली असून, खरेदी-विक्रीचे व्यवहार मर्यादित प्रमाणात होत असल्याचेही चित्र आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR