23.2 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeलातूरऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत लातुरात नाकाबंदी 

ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत लातुरात नाकाबंदी 

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने दिनांक २१ फेब्रुवारी रोजी रात्री लातूर जिल्हा पोलिसांकडून शहरात ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान शहरातील विविध ठिकाणी अचानक नाकाबंदी, वाहन तपासणी, संशयितांची चौकशी तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
ही मोहीम पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक  मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शहरातील गांधी चौक, शिवाजीनगर, विवेकानंद चौक व एमआयडीसी या चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी नाकेबंदी व तपासणी मोहीम राबविण्यात आली. ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत नाकेबंदी दरम्यान हुल्लडबाजी करत वाहन चालवणे, ट्रिपल सीट मोटारसायकल चालवणे, विनापरवाना वाहन चालवणे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण २२ प्रकरणे नोंदवून सुमारे ३५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात करण्यात आला.
पोलीस स्टेशन एमआयडीसी हद्दीत देखील व्यापक वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान एकूण २८ वाहनांवर कारवाई करण्यात आली. १७ हजार ४०० रुपये दंड आकारण्यात करण्यात आला. तसेच फटाका सायलेन्सर लावलेल्या तीन बुलेट मोटारसायकली व ट्रिपल सीट चालविणारी तीन वाहने पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन येथे डिटेन करण्यात आले असून पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीत नाकाबंदी दरम्यान २८ वाहणावर कार्यवाही करूण २४ हजार रू दंड आकारण्यात आला व पोलीस  ठाणे विवेकानंद चौक यांनी मोटर वाहन कायद्यान्वये आठ केसेस करून ५ हजार ५०० रुपयांचा दंड आकारला तसेच अवैधपणे शस्त्र घेऊन फिरणा-या विरुद्ध शस्त्र अधिनियम प्रमाणे एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहीमेअंतर्गत शहरातील प्रमुख चौक, वर्दळीचे रस्ते तसेच शहराच्या प्रवेशद्वारांवर कडक नाकेबंदी करण्यात आली. संशयास्पद हालचाली करणा-या व्यक्तींची तपासणी करण्यात आली. रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच तडीपार आरोपींवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही ट्यूशन परिसरात गस्त वाढविण्यात आली. वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी मद्यपान करून वाहन चालवणा-यांची तपासणी तसेच नियमबा  बदल केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR