लातूर : प्रतिनिधी
देशातील पहिले पत्रकार मित्रांचे संघटन असलेल्या ऑल जर्नालिस्ट अॅण्ड फ्रेंड सर्कलचे महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून लातूर येथील पत्रकार उमरदराज महेबूब मुकदम (खान) यांची निवड झाली असून नुकतेच त्यांना २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत संघटनेच्या कार्यक्रमात निवडीबाबतचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
पत्रकारांसाठी काम करणा-या या संघटनेचे ध्येय व धोरणानुसार समाजात कार्य करावे अशी अपेक्षा संघटनेने ठेवली असून उमरदराज खान यांच्या निवडीबाबत त्यांचे कुटुंब, मित्र व समाजातील विविध स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

