20.7 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeक्रीडाऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी घेतली टीम इंडियाची भेट

ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी घेतली टीम इंडियाची भेट

ऍडलेड : वृत्तसंस्था
भारतीय संघ बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौ-यावर आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील ऍडलेडच्या मैदानात रंगणा-या सामन्याआधी टीम इंडियातील खेळाडू दोन दिवसीय सराव सामन्यासाठी कॅनबेरा येथे पोहोचले आहेत.

गुरुवारी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि भारतीय संघातील खेळाडू यांची ग्रेट भेट झाल्याचा सीन पाहायला मिळाला. कॅनबेरा येथील संसद भवनात झालेल्या या खास भेटीत कॅप्टन रोहित शर्माने ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना संघातील खेळाडूंची ओळख करून दिली. या भेटीचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

जो व्हीडीओ व्हायरल होतोय त्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना संघातील खेळाडूंची ओळख करून देताना दिसतो. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान सर्वांत आधी पर्थच्या मैदानात टीम इंडियाचे नेतृत्व केलेल्या जसप्रीत बुमराहशी चर्चा करताना दिसून येतात. त्यानंतर ते किंग कोहलीकडे वळतात. विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यात खास संवाद रंगल्याचेही व्हीडीओत पाहायला मिळते. पर्थच्या मैदानात विराट कोहलीने केलेल्या शतकी खेळीचे ते तोंडभरून कौतुक करतात. यावर विराट कोहली खास अंदाजात रिप्लाय देतानाही पाहायला मिळते.

पर्थवरची शतकी खेळी खूपच छान. आम्हाला तो क्षण त्रासदायक वाटला नाही, असे म्हणत कोहलीच्या शतकाचा आपल्यालाही आनंद झाला, अशी भावनाच जणू त्यांनी व्यक्त केली. त्यावर रिप्लाय देताना किंग कोहलीने ‘स्­पाइसी’ शब्दाचा उल्लेख केला. ज्यामुळे छोटा संवाद अधिक मसालेदार झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन यांची भेट घेतल्याचे व्हीडीओत दिसून येते.

पिंक बॉल टेस्टसाठी भारतीय संघ ३० नोव्हेंबरपासून प्राईम मिनिस्टर इलेव्हन संघासोबत दोन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. हा सामना कॅनबेरातील मनुका ओव्हलच्या मैदानात रंगणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR