21.6 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeलातूरऔषधी भांडार कक्षाला शॉर्टसर्किटमुळे आग

औषधी भांडार कक्षाला शॉर्टसर्किटमुळे आग

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
शिरूर अनंतपाळ येथील ग्रामीण रुग्णालयाच्या औषधी भांडार कक्षाला शॉर्टसर्किट मुळे सोमवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे औषधे जळून खाक झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच सिव्हील सर्जन ढेले यांनी मंगळवारी सकाळी रूग्णालयास भेट देऊन घटनेची पाहणी केली.
या नूतन ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन होऊन सहा महिनेही झाले नाहीत.यात अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागून औषधी भांडार  कक्षांतील औषधी जळून खाक  झाली आहे.अग्निशमन दलाला पाचारण करून बोलावण्यात
आले. तोपर्यंत औषधी जळून खाक झाल्या.  दरम्यान शिरूर अनंतपाळ येथील ग्रामीण रुग्णालय अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुरु झाले. त्यात अगोदरच अधिकारी व कर्मचा-यांची कमतरता होती. या रुग्णालयातील औषध निर्माते एक महिन्यापासून मेडिकल रजेवर आहेत त्यामुळे औषध भांडार कक्ष चक्क बंदच आहे. त्यात सोमवारी मध्यरात्री शॉट सर्किटमुळे औषधी  भांडार कक्षाला आग लागून रुग्णालयातील संपूर्ण औषधी साठा जळून खाक झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR