Homeलातूरऔसा येथे ईदगाह रस्त्यावर ठेकेदाराकडून अतिक्रमण

औसा येथे ईदगाह रस्त्यावर ठेकेदाराकडून अतिक्रमण

औसा : प्रतिनिधी
औसा शहरातील ईदगाहकडे जाणारा मुख्य रस्ता सिव्हील हॉस्पिटलच्या बांधकाम ठेकेदाराने अतिक्रमण करून बंद केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या विरोधात एमआयएमच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, येत्या २१ मार्च रोजी रमजान ईद असल्यामुळे मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने ईदगाह येथे नमाज अदा करण्यासाठी येतात मात्र, ईदगाहकडे जाणा-या पारंपरिक रस्त्यावर ठेकेदाराने शौचालय उभारून तसेच सिमेंटचा चिखल व बांधकाम साहित्य टाकून रस्ता पूर्णपणे बंद केला आहे.

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, ईदच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एमआयएमचे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांनी प्रशासनास तातडीने हस्तक्षेप करून संबंधित शौचालय हटवून रस्त्यावरील अडथळे दूर करण्याची मागणी केली आहे. तसेच रस्ता त्वरित मोकळा करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणी नगर परिषद औसा तसेच स्थानिक पोलीस ठाण्यासही निवेदन देण्यात आल असून, प्रशासन आता कोणती कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR