Homeलातूरऔसा शिक्षक पतसंस्थेचा दैदीप्यमान विकास कौतुकास्पद

औसा शिक्षक पतसंस्थेचा दैदीप्यमान विकास कौतुकास्पद

औसा : प्रतिनिधी
औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित, औसा गेल्या १२ वर्षापासून दरवर्षी संस्थेचा वर्धापन दिन, महात्मा ज्योतिबा फुले व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तसेच उन्हाळयाच्या तीव्रतेमुळे लातूर जिल्ह्यातील रुग्णांना होणा-या रक्तपेढीतील रक्ताच्या तुटवड्यामुळे रक्तदान शिबीर आयोजित करीत आहे. हा उपक्रम व औसा शिक्षक पतसंस्थेचा झालेला दैदीप्यमान विकास कौतुकास्पद असल्याचे गैरवोद्गार धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी काढले.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन महादेव खिचडे हे होते तर प्रमुख पाहुणे संतोष सोमवंशी, अमर खानापुरे, विक्रम पाटील, जयश्री उटगे, सुरेश भुरे, बंडू कोद्रे यांीची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन महादेव खिचडे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला व अशा सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाशी असलेली बांधिलकी अधोरेखित केली.

यावेळी खासदार ओमराजे निबाळकर यांनी महान व्यक्तींच्या जयंतीनिमित्त गेल्या १२ वर्षापासून औसा शिक्षक पतसंस्था रक्तदान शिबीर आयोजित करते, असे सांगून आजच्या काळात पतसंस्था चालवणे खूप अडचणीचे आहे कारण मीही पूर्वी पतसंस्था चालवलेली आहे त्यामध्ये किती अडचणी येतात आणि कोणत्या अडचणीतून जावे लागते हे मला खूप जवळून माहिती आहे. त्यासोबत या पतसंस्थेने जे-जे उपक्रम म्हणजेच मॅरेथॉन स्पर्धा, महिलांच्या विविध खेळाच्या स्पर्धा, स्वरचित काव्य स्पर्धा राबवल्याबद्दल पतसंस्थेच्या संचालक मंडळाचे अभिनंदन करून मॅरेथॉन स्पर्धा प्रत्येक वर्षी यापुढे घ्याव्यात अशीही सूचना त्यांनी केली. तसेच ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून यामुळे अनेकांना नवजीवन मिळते, असे प्रतिपादन करीत आरोग्याची काळजी घ्यावी, दररोज व्यायाम करावे व निरोगी राहावे असे ते म्हणाले. प्रस्ताविकामध्ये चेअरमन महादेव खिचडे यांनी मांडलेली दोन्ही प्रश्न मी लोकसभेच्या पुढील अधिवेशनत मांडून ते सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे संगितले. या शिबिरात ९५ शिक्षक रक्तदात्यांनी स्वेच्छेने सहभाग नोंदविला परंतु काही शिक्षकांना बी.पी., शुगर, एच.बी. इत्यादी कारणामुळे रक्तदान करता आले नसून प्रत्यक्षात भर उन्हाळ्यात ५२ शिक्षक/ शिक्षीकांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हाईस चेअरमन हरीश आयतनबोने यांनी प्रभावीपणे केले तर सचिव संजय जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संचालक युसुफ पिरजादे, मधुकर गोरे, रमेश जाधव, महेश कांबळे, अमोल शेळके, दिपक डोंगरे, संजय रोडगे, संचालिका मंदाकिनी माने, संगीता कानडे, पतसंस्थेचे कर्मचारी मल्हारी कांबळे, शिरीष पवार, विनय आयतनबोने यांनी मोलाचे सहकार्य केले. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR