Homeलातूरकडक उन्हात लिंबू खातोय भाव!

कडक उन्हात लिंबू खातोय भाव!

लातूर : प्रतिनिधी
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून मोठ्या प्रमाणावर सुर्यदेव आग ओकत आहे. यातच किरकोळ बाजारपेठेत भाजीपाल्याच्या दरात काही प्रमाणावर वाढ झाली असली तरी, बाजारपेठेत लिंबू सध्या चांगलाच भाव खात आहे. बाटलीबंद शीतपेयांपेक्षा लिंबु शरबत अधिक पसंद केले जात असल्याने लिंबुला सर्वाधिक मागणीही आहे.
उन्हाळयात घशाला कोरड पडली की आठवते शीतपेय किंवा लिंबू शरबत. केवळ याचसाठी नाही तर चक्कर येणे, गरगरणे, उन्हाचा त्रास होणे यासाठी होणारा लिंबाचा वापर पाहता उन्हाळ्यात लिंबाला बाजारपेठेत विशेष मागणी असल्याने आता लिंबाचे वाढता भाव पाहता सर्वसामान्य ग्राहकाला लिंबू महाग झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या चांगल्याच झळा जानवत असल्याने शहरात ठिकठिकानी लिंबू शरबताचे गाडे लावण्यात आले आहेत. शरबतासाठी विशेषकरून लिंबाला जास्त मागणी असल्याने लिंबाचे वाढलेले दर पाहता बाजारात आता लिंबू चांगलाच भाव खात असल्याचे दिसून येत आहे. सध्या उन्हाचा तडाका चांगलाच जानवत असल्याने लिंबूचे भाव तेजीत आहे. सध्या बाजारात द्राक्ष ५० ते ६० रुपये किलो मात्र, एरव्ही अगदी किरकोळ भावात मिळणारे लिंबू आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अधिक भावाने मिळत असल्याने लिंबू शरबत घेतानाही ग्राहकाला दहावेळा विचार करावा लागत आहे. एरव्ही अगदी १०, २० रुपयांना पाच ते आठ मिळणा-या लिंबाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढती दिसून येत आहे. अगदी बाजारपेठांमधून स्वस्तात मिळणारे लिंबू उन्हाळ्यात जरा जास्तच भावाने मिळत आहेत.
सध्या लिंबू तेजीत असून सध्या खरेदीमध्ये १० रुपयांना एक किंवा लहान असेल तर दोनच ल्ािंबू मिळत आहेत. विशेष म्हणजे मागणीच्या तुलनेत बाजारात लिंबू कमी येत असल्याने आणखी भाव वाढेल, अशी शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. यामुळे यंदाच्या उन्हात शीतलता देणारे सरबताचे लिंबू जास्त भावात आलेले दिसून येत आहेत. लिंबाची वाढती मागणी पाहता बाजारपेठांमध्ये केली जाणारी लिंबू पाहता खास उन्हाळ्यात शरबतासाठी लिंबांची खरेदी केली जाते. मात्र एकीकडे लिंबाचे भाव वाढले असले तरी ग्राहकांची लिंबू शरबताला पसंती दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात लिंबाची आवक कमी असली तरी मागणीत वाढ दिसून येते आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR