नागपूर : खोकल्याचा त्रास जाणविल्यानंतर देण्यात आलेल्या कफ सिरपमुळे नागपुरात दाखल १३ मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथून आलेल्या ३६ पैकी १३ बालकांचा मृत्यू झाला आहे. यात प्राथमिक तपासणीत १३ रुग्णाचा सबंध आणि हिस्ट्री मध्ये कफ सायरफ असल्याचे समोर आले असून मुलांच्या मृत्यूनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
नागपूर महानगर पालिका आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सुरवातीला उपचारासाठी आलेल्या केसेसवर अॅक्युट इन्सफलाईटीस सिंड्रोम म्हणजेच ‘मेंदूज्वर’ म्हणून उपचार करण्यात आले आहेत. मात्र नंतर हा मेंदूज्वर नसून विषबाधेचा प्रकार असल्याचे तपासणीत समोर आले. खासकरून मध्य प्रदेशातून नागपुरात उपचारासाठी आलेल्या रुग्णांची किडनी निकामी होऊन मेंदूवर सूज येणे आणि नंतर रुग्ण कोमामध्ये जात मृत्यू होणे असे लक्षण दिसून आले.
कफ सिरपमुळे आतापर्यंत नागपुरात विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले एकूण १३ मुलांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृत लहान मुले हि मध्य प्रदेशातील छिंदवाडा आणि सिवनी जिल्ह्यातील आहेत. नागपुरात उपचारासाठी आतापर्यंत एकूण ३६ रुग्ण दाखल झाले होते. यापैकी छिंदवाडा जिल्ह्यातील १२ आणि सिवनी जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृतांमध्ये समावेश आहे. नागपुरातील शासकीय मेडिकल रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयात या मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

