करपलेल्या पिकांवर पाऊस

लातूर : टिम एकमत
लातूर जिल्ह्यात पावसाने दिलेली प्रदीर्घ ओढ आणि खंडामुळे खरिपाचे पीक पूर्णपणे करपून गेले आहे. शेतक-यांवर मोठे संकट ओढवले आहे. ‘पाऊस नाही तर काहींच उगवणार नाही’, या परिस्थतीचा फटका लातूर जिल्ह्यातील शेतक-यांना बसला आहे. ‘सोयाबीनचे हब’, अशी ओळख असलेल्या लातूर जिल्ह्यातील ४८००१५.९५ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन करपले आहे. विशेष म्हणजे सोयाबीन करपून गेल्यानंतर दि.१८ ते १९ सप्टेंबरच्या मध्यरात्री करपलेल्या पिकांवर पाऊस पडला. त्याचा या पिकांना काहींच उपयोग झाला नाही.
लातूर जिल्ह्यातील खरिपाचे क्षेत्र ५७७२३८.०७ हेक्टर एवढे आहे. सोयाबीनचा जिल्हा असलेल्या लातूर जिल्ह्यात जुनमध्येच पावसाने दगा दिला. जुन, जुलै महिन्यांत पेरणी योग्य पाऊस पडला नाही. तरीही शेतक-यांनी मोठे धाडस करुन पेरण्या उरकल्या. अधुन-मधून सौम्य, तुरळक ते मध्यम स्वरुपाच्या पावसाने बहूतांश ठिकाणची खरीप पिके तरली. काही ठिकाणी दुबार पेरणीही करावी लागली. मात्र गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पाऊस गायब असल्याने ऐन फुलो-यात आणि शेंगा भरण्याच्या महत्वाच्या टप्प्यात पिकाला पाणी मिळाले नाही. त्यामुळे शेतात सोयाबीनचे पीक उभे असले तरी जमिनीतील ओलावा कमी झाल्याने सोयाबीनचे पीक पिवळे पडले आहे. काही ठिकाणीची पिके करपली आहे तर काही ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून शेंगाची संख्या आणि दाणे भरण्यावरही परिणाम झाल्याने यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील शेतक-यांनी यंदा चांगल्या पावसाच्या अपेक्षेने मोठ्या क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली. पेरणीपूर्व मशागत, बियाणे, पेरणी, खते, तणनाशके तसेच कीडरोग नियंंत्रणासाठी करण्यात आलेल्या फवारण्यांवरही मोठा खर्च झाला आहे.
मात्र पिकाला आवश्यक असलेल्या महत्वाच्या काळात पुरेसा पाऊस न पडल्याने हा सर्व खर्च आता वाया जाण्याच्या परिस्थितीत आहे. जिल्ह्यातील अनेक शेतशिवारांतील सोयाबीनचे पीक सुकू लागली  आहेत. काही ठिकाणी पिकांची अवस्था अत्यंत  गंभीर झाली आहे. पावसाअभावी झाडांची वाढ  खुंटल्याने शेंगांची संख्या कमी होण्याचे तसेच दाणे पूर्णपणे न भरण्याची परिस्थिती ओढवली आहे.  परिणामी अपेक्षीत उत्पादन मिळणे कठीण झाले  असून मिळणा-या उत्पन्नातून लागवडीचा खर्च तरी भरुन निघेल का, असा प्रश्न शेतक-यांसमोर निर्माण झाला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41

Latest news