26.2 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रकराड दक्षिण मधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव

कराड दक्षिण मधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव

कराड : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूकाचे निकाल सुरु झाले आहेत. निकालात महायुतीने स्पष्ट बहुमताच्या दिशेने चालली आहे. या विधानसभेच्या निकालात महायुतीला चांगली आघाडी मिळालेली आहे.

भाजपाच्या १३० जागांवर उमेदवार मतमोजणीत पुढे आहेत. तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ५५ जागांवर आघाडीवर आहे. तर अजितदादांची राष्ट्रवादी ४० जागांवर आघाडीवर आहे. भाजपाचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत. तर एकनाथ शिंदे गटाचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. तर अजितदादा गटाचे २ उमेदवार विजयी झाले आहेत. कराड दक्षिण मतदार संघातून धक्कादायक निकाल आलेला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालेला आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालेला आहे. त्याच्या विरोधात भाजपाचे अतुल भोसले निवडणूक लढवित होते. अतुल भोसले मतमोजणी सुरु झाल्यापासून सुरुवातीपासून आघाडीवर होते. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात कायम कॉंग्रेसचा प्रभाव राहिलेला आहे. येथून सात वेळा कॉंग्रेसचा विजय झालेला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR