21.4 C
Latur
Saturday, December 7, 2024
Homeमहाराष्ट्रकरुणा शर्मांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

करुणा शर्मांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

बीड : प्रतिनिधी
परळी विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असे असताना राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित करुणा शर्मा यांनी २० नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा व्हीडीओ शेअर करून खळबळ उडवून दिली. करुणा यांनी इन्स्टाग्रामवरून व्हीडीओ शेअर करत त्यात काही तरुणींची नावे घेत मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत.

धनंजय मुंडे सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये कृषिमंत्री आहेत. ते बीड जिल्ह्यातील परळी विधानसभेचे आमदार आहेत. करुणा शर्मा धनंजय मुंडेंबद्दल म्हणाल्या, जो मेहुणीवर बलात्कार करतो. तुमच्या पैशांनी, जनतेच्या पैशांनी काय करतो.. फक्त प्राजक्ता माळीसारख्या मुलींचा.. स्वातिका शिरोडकर, मोनिका, लता टेपी यासारख्या मुलींचे घर भरतो, ओबेरॉय हॉटेल पूर्ण बुक असते, या लोकांच्या अय्याशीसाठी, असा घणाघाती आरोपही करुणा शर्मा यांनी केला आहे.

धनंजय मुंडेंइतका सत्तेचा गैरवापर कुणीच केला नाही. स्वत:च्या बायकोला तीन तीन वेळा जेलमध्ये टाकले, गुंडांकरवी मारहाण करून घेणे, तीन वेळा तुरुंगात टाकले, गुंडासारखी मारहाण केली, पत्नीला पोलिसांच्या हातून मारहाण करणे.. तुमचे काय भले करेल तो? असे प्रश्न करुणा शर्मा यांनी उपस्थित केले.

जो मेहुणीवर बलात्कार करतो. तुमच्या पैशांनी, जनतेच्या पैशांनी काय करतो.. फक्त प्राजक्ता माळीसारख्या मुलींचा.. स्वातिका शिरोडकर, मोनिका, लता टेपी यासारख्या मुलींचे घर भरतो, ओबेरॉय हॉटेल पूर्ण बुक असते, या लोकांच्या अय्याशीसाठी, असा घणाघाती आरोपही करुणा शर्मा यांनी केला आहे.

हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो की, अशा लोकांना मतदान देऊ नका. अपक्ष उमेदवारही उभे असतील, चांगले लोकही उभे असतील. का तुम्हाला तोच-तोच नेता हवाय? किती गैरवापर करतात. तुमचा हजारो कोटी रुपयांचा निधी खाऊन टाकतात, असा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR