कर्जमाफी थकबाकीदारांना; नियमित कर्ज परतफेड करणारे दुर्लक्षीत

निलंंगा: प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील नियमितपणे कर्जाची परतफेड करणा-या शेतक-यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच आली आहे. तालुक्यातील एकूण ३७ हजार ४९ शेतकरी खातेदारांपैकी २८ हजार ९५७ शेतकरी नियमित कर्जदार असून, ८ हजार ९२ शेतकरी थकबाकीदार आहेत. शासनाच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत ६ हजार ९९६ थकबाकीदार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला; मात्र प्रामाणिकपणे कर्ज फेडणा-या हजारो शेतक-यांना जाहीर केलेले प्रोत्साहनपर अनुदान अद्याप मिळालेले नाही. १ एप्रिल २०१९ ते जून २०२५ या कालावधीतील शासनाच्या निकषांनुसार पात्र ठरलेल्या थकबाकीदार शेतक-यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले. त्यानंतर निलंगा तालुक्यातील ६ हजार ९९६ शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याची माहिती सहाय्यक निबंधक एन. एस. किलचे यांनी दिली. विशेष म्हणजे, नियमितपणे कर्ज घेऊन वेळेत परतफेड करणा-या शेतक-यांची संख्या तब्बल २८ हजार ९५७ आहे. या शेतक-यांनी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कर्जाची परतफेड केली; मात्र आता त्यांनाच प्रोत्साहनपर अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. नियमित कर्जदारांच्या याद्याही मागविण्यात आल्या नसल्याची माहिती असून, त्यामुळे शेतक-यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
‘प्रामाणिकपणे कर्ज भरा’ म्हणणा-या शासनाने प्रामाणिक शेतक-यांनाच प्रतीक्षेत ठेवणे कितपत योग्य?, असा सवाल नियमित कर्जदार शेतक-यांकडून उपस्थित केला जात आहे. थकबाकी ठेवल्यास कर्जमाफी आणि वेळेत कर्ज फेडल्यास केवळ आश्वासन, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नियमित कर्जदारांमध्ये संताप आहे. शासनाने जाहीर केलेले प्रोत्साहनपर अनुदान तातडीने वितरित करावे, अशी मागणी निलंगा तालुक्यातील नियमित कर्जदार शेतक-यांतून जोर धरत आहे. अन्यथा भविष्यात नियमितपणे कर्जाची परतफेड करणा-या शेतक-यांमध्येही संभ्रम निर्माण होऊन कर्जशिस्तीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31

Latest news