15.2 C
Latur
Wednesday, November 12, 2025
Homeसोलापूरकर्मचा-यांना चिकन मसाल्याची दिवाळी भेट 

कर्मचा-यांना चिकन मसाल्याची दिवाळी भेट 

 मंदिरात सुरक्षा रक्षक पुरवणा-या कंपनीचा प्रताप

    सोलापूर : प्रतिनिधी
श्रीक्षेत्र पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे केंद्रस्थान मानले जाते. येथे दरवर्षी लाखो वारकरी ‘माऊली माऊली’चा गजर करत पायी वारी करतात. वारकरी परंपरेनुसार शाकाहार, संयम आणि साधेपणा ही जीवनशैली मानली जाते. मांसाहार, मद्यपान किंवा त्यासंबंधित कोणत्याही वस्तूंना येथे थारा नसतो. अशा ठिकाणी ‘चिकन मसाल्या’सारख्या वस्तूंची भेटवस्तू म्हणून वाटप झाल्याने अनेक भक्तांचा भावनिक रोष व्यक्त होत आहे. कर्मचा-यांना मिळालेल्या भेटवस्तूंमध्ये कंपनीची इतर उत्पादनेही देण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरात सुरक्षारक्षक, स्वच्छता कर्मचारी आणि इतर काही सेवा बीव्हीजी कंपनी आऊटसोर्सिंग पद्धतीने पुरवते. दिवाळीच्या निमित्ताने या कर्मचा-यांना कंपनीकडून भेटवस्तू देण्यात आल्या. परंतु भेट पिशवीत चिकन मसाल्याचे पाकीट असल्याचे दिसून आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सध्या वारकरी संप्रदायातून चिकन मसाल्याच्या भेटवस्तूबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
  पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला  सुरक्षा रक्षक   पुरवण्याचा ५ कोटी ७७ लाख रुपयांचा ठेका बीव्हीजी ग्रुपला  मिळाला होता. मे महिन्यापासून मंदिरात सुरक्षारक्षक पुरवण्याची जबाबदारी या ग्रुपला मिळालीय. यापूर्वी ठेका असणा-या ठेकेदाराकडून मंदिराचे नियम पाळले जात नसल्याने त्याचा ठेका रद्द करण्यात आला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR