24 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeमहाराष्ट्रकल्याण-डोंबिवलीत फोडाफोडीचे राजकारण?

कल्याण-डोंबिवलीत फोडाफोडीचे राजकारण?

  श्रीकांत शिंदेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण

कल्याण : राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला, अनेकांना पक्षांनी तिकिट दिले नाही म्हणून त्यांनी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवली. आता ते नगरसेवक पुन्हा आपल्या जुन्या पक्षाकडे परत जाणार का? अशी चर्चा रंगली आहे. याचे कारण म्हणजे कल्याण-डोंबिवलीमधील रात्री झालेल्या गाठीभेटी… कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले. यातील प्रभाग क्रमांक १३ मधून निवडून आलेले शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे विजयी नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी शुक्रवार, १६ जानेवारी रोजी शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चेला एकच उधाण आले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत फोटो व्हायरल झाल्याने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार हे शिवसेनेच्या वाटेवरती असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मधुर म्हात्रे यांनी श्रीकांत शिंदेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण
कल्याण-डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या नगरसेवकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. ठाकरेंचे नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे. मधुर म्हात्रे शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती आहे. मधुर म्हात्रे यांनी श्रीकांत शिंदेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

श्रीकांत शिंदेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण
कल्याण-डोंबिवली निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच ठाकरे गटाचे ११, मनसेचे ५, काँग्रेसचे २ तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा १ नगरसेवक निवडून आला आहे. त्यामुळे शिवसेना भाजपाच्या नगरसेवकांना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच मधुर म्हात्रे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने ते परत शिंदेंच्या शिवसेनेत जाणार का? अशा विविध राजकीय चर्चा रंगल्या आहेत

उमेदवारी न दिल्याने त्यांनी मशाल घेतली हाती
मधुर म्हात्रे हे आधी शिवसेना शिंदे गटात होते. मात्र, ऐन निवडणुकीच्या काळात शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी मशाल हाती घेत ठाकरे गटातून निवडणूक लढवली आणि विजयी देखील झाले. त्यामुळे आता मधुर म्हात्रे यांच्या पुढील राजकीय निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR