26.9 C
Latur
Thursday, January 22, 2026
Homeलातूरकाँग्रेसकडून इच्छुकांचा मुलाखतींना उदंड प्रतिसाद

काँग्रेसकडून इच्छुकांचा मुलाखतींना उदंड प्रतिसाद

लातूर : प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाकडून नुकताच राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर लातूर शहर काँग्रेस कमिटीने या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार लातुर मनपा निवडणुकीकरिता दि. १७  व १८ डिसेंबर असे दोन दिवस काँग्रेस भवनात इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती अत्यंत उत्साही वातावरणात पार पडल्या ज्याला उदंड, असा प्रतिसाददेखील मिळाला. राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलाखतींचे नियोजन करण्यात आलेले होते.
या मुलाखतींच्या वेळी निवड प्रक्रियेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा लातूर जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक डॉ. जितेंद्र देहाडे, शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, प्रदेश सचिव-अ‍ॅड. समद पटेल, माजी महापौर अ‍ॅड.  दीपक सूळ, माजी महापौर प्रा. डॉ. स्मिताताई खानापुरे, माजी उपमहापौर कैलास कांबळे, सेवादल शहराध्यक्ष सुपर्ण जगताप, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. फारुक शेख, ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष चंद्रकांत धायगुडे, अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष प्रा. प्रवीण कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता राहावी यासाठी प्रभागांनुसार मुलाखतींचे वेळापत्रक ठरवण्यात आले होते. यानुसार १७ डिसेंबर सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत प्रभाग १ ते १२ मधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या तर १८ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत प्रभाग १३ ते १८ मधील उर्वरित इच्छुकांशी संवाद साधण्यात आला. लातूर शहरात काँग्रेसची पकड मजबूत करण्यासाठी आणि सर्व समाजघटकांना योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे या प्रक्रियेवरून स्पष्ट होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR