21.6 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसकडून एका जातीला दुस-या जातीशी लढवण्याचा खतरनाक खेळ

काँग्रेसकडून एका जातीला दुस-या जातीशी लढवण्याचा खतरनाक खेळ

धुळे : प्रतिनिधी
एका जातीला दुस-या जातीशी लढवण्याचा खतरनाक खेळ काँग्रेस खेळत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित आणि मागासवर्गीयांसाठी आरक्षण आणले. त्यासाठी त्यांना लढावे लागले.

ओबीसींना प्रतिनिधित्व न मिळावे यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले. इंदिरा गांधी यांच्यानंतर राजीव गांधी आले, त्यांनीही ओबीसी आरक्षणाचा खून केला, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. धुळे येथे आयोजित महायुती उमेदवारांच्या प्रचार सभेतून ते बोलत होते.

नरेंद्र मोदी म्हणाले की, भाजपची ‘सबका साथ सबका विकास’ ही भूमिका आहे. आदिवासी समाजाने देशाच्या विकासासाठी कामे केली. काँग्रेसने आदिवासी गौरवासाठी कधी काम केले नाही. जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार आले, तेव्हा पहिल्यांदा आदिवासी मंत्रालय बनले. आमच्या सरकारने बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे कार्यक्रम केले. भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी करणार आहोत.

वन पट्ट्याचा लाभ आदिवासी समाजाला मिळेल यासाठी आम्ही काम केले. द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्या. त्यांना हरविण्यासाठी काँग्रेसने ताकद लावली होती. त्यांचा अपमान केला. ही त्यांची जुनी सवय आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हरविण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले.

एका जातीला दुस-या जातीशी लढवण्याचा खतरनाक खेळ काँग्रेस खेळत आहे. मात्र हे पुढे गेलेले काँगेसला आवडत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित आणि मागासवर्गीयांसाठी आरक्षण आणले. त्यासाठी त्यांना लढावे लागले. ओबीसींना प्रतिनिधित्व मिळू नये यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले. इंदिरा गांधींनंतर राजीव गांधी आले, त्यांनीही ओबीसी आरक्षणाचा खून केला. ओबीसी आरक्षण आले असते तर त्यांचे दुकान बंद झाले असते. आता त्यांच्या घरातील चौथी पिढी तेच करत आहे. एससी, ओबीसी समाजाची एकता तुटली जावी, यासाठी काँग्रेस काम करत आहे. एससी समाज वेगवेगळ्या जातींत विखुरला जावा, यासाठी काँग्रेस काम करत आहे.

एक है तो सेफ है
भिल्ल, कोळी, महादेव, कोकणा, कोकणी, पारधी, अशा अनेक आदिवासी जाती एकत्र धुळ्यामध्ये राहतात, काँग्रेस यांना एकमेकांशी लढविण्याचा प्रयत्न करत आहे. आदिवासींची ओळख तोडण्याचे काम काँग्रेस करत आहे. देशातील आदिवासी जाती एकमेकांशी लढत राहाव्या, हा काँग्रेसचा अजेंडा आहे. धर्माच्या नावावर काँग्रेसने असे केले तेव्हा देशाची फाळणी झाली होती, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एक है तो सेफ है’ अशी नवी घोषणा दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR