काँग्रेसची विजयादशमी!

राज्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा गोकुळ दूध संघाचा अवघड गड काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी सर केला आहे. सत्ताधारी युती आणि विरोधी आघाडीची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या महासंग्रामात सोमवारी सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागांवर विजयाचे सोने लुटले आणि विजयादशमी साजरी केली. मतपत्रिकांद्वारे घेण्यात आलेल्या या अटीतटीच्या लढ्यात सत्ताधारी महायुतीप्रणित सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीला मोठा फटका बसला असून त्यांना १२ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. कोल्हापुरातील प्रतिष्ठेची लढाई मानली जाणारी गोकुळ दूध उत्पादक संघाच्या या निवडणुकीची राज्यभर चर्चा सुरू होती. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती.

सतेज पाटील यांच्या पॅनलने मोठे यश मिळवल्याने विरोधकांचे बळ वाढले आहे तसेच ‘ईव्हीएम’ हटवून मतपत्रिकांद्वारे निवडणुका घेण्याच्या मागणीला आता बळ मिळेल, अशीही चर्चा आहे. महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवार शौनिका अमल महाडिक यांना काँग्रेसप्रणित सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे उमेदवार राजू जयवंतराव आवळे यांच्याकडून अवघ्या ७ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या निसटत्या पराभवामुळे महाडिक कुटुंबासह भाजप आणि महायुतीला मोठा राजकीय धक्का बसला आहे. गोकुळच्या निवडणुकीत मतदाराने एकनिष्ठ राहावे यासाठी त्यांना देवतांच्या शपथा घालण्यात आल्या होत्या. भंडा-याची राख, देवाच्या शपथा आणि जाडजूड पाकिटांसह सहलीला नेण्याच्या मोहाला न भुलता मतदारांनी स्वाभिमानाचा दणका दिल्याचे दिसते. गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या २५ जागांसाठी ५० उमेदवार निवडणुकीत उतरले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील ५ हजार ४१८ पात्र मतदारांपैकी ५ हजार ४१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागांवर विजय मिळवला. महायुतीप्रणित सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीला १२ जागांवर समाधान मानावे लागले.

‘गोकुळ’चे मावळते अध्यक्ष नविद मुश्रीफ, अरुण डोंगळे, विश्वास पाटील या माजी अध्यक्षांना पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. ही निवडणूक महायुतीने प्रतिष्ठेची केली होती. मुख्यमंत्र्यांपासून ते जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला होता. विरोधात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी एकहाती प्रचार केला होता. दूध उत्पादक सभासद शेतक-यांनी दिलेला निकाल आम्ही स्वीकारत आहोत. महायुतीमध्ये शेवटपर्यंत सुरू असलेले मतभेद आणि त्यानंतर झालेली युती कदाचित या निकालास कारणीभूत असावी, असे महायुतीचे नेते, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. हा निकाल गोकुळच्या सभासदांच्या एकीचा आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता मतदारांनी समविचारी आघाडीला मतदान करून विजयी केले. त्यांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवू असे समविचारी आघाडीचे नेते सतेज पाटील म्हणाले.

निकाल घोषित होताच सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा या जनसंपर्क कार्यालयावर जणू दस-यापूर्वीच दिवाळी साजरी झाली. दूध उत्पादक आणि कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात सतेज पाटलांना खांद्यावर घेतले. गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी केली. गत अनेक वर्षापासून गोकुळ दूध संघावर असलेले महाडिक घराण्याचे वर्चस्व या निवडणुकीत मोडीत काढत सतेज पाटील यांनी समविचारी आघाडीची सत्ता स्थापन करून महायुतीला मोठा धक्का दिला. या निवडणुकीत पारंपरिक राजकीय घराण्यातील अनेक दिग्गज नेते मैदानात असले तरी मतदारांनी महायुतीच्या दोन प्रमुख नेत्यांना चांगलाच दणका दिला. महायुतीचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव मावळते अध्यक्ष नविद मुश्रिफ यांना ओबीसी गटातून समविचारीचे शशिकांत खोत यांनी ६९ मतांनी पराभूत केले. त्यांच्यासह गोकुळचे अरुण डोंगळे, विश्वास पाटील या माजी अध्यक्षांनाही पराभवाची चव चाखावी लागली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
PURNA| तालुक्यातील निळा-महागाव रस्त्याचा प्रश्न मार्गी|आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
03:59
Video thumbnail
Latur Bus Stand Dirty Condition | मध्यवर्ती बसस्थानकात घाणीचे साम्राज्य | एकमत डिजिटल
02:32
Video thumbnail
Latur Gandhi Chowk Police Station | सलग पाचव्यांदा जिल्ह्यात प्रथम क्रमांक | एकमत डिजिटल
02:56
Video thumbnail
Latur Surya Dakshin Hotel Controversy | MR संघटनांची पोलिसांत तक्रार
02:45
Video thumbnail
Nanded Sachkhand Gurudwara Takht Snan | तख्त स्नानने दिवाळी पर्वाला सुरुवात
02:47
Video thumbnail
Latur|सूर्या दक्षिण हॉटेल मालकाच्या वक्तव्यावरून MR संघटना आक्रमक | निषेध आणि माफीची मागणी
04:04
Video thumbnail
Latur District Bank|आमचा दृश्यम नव्हे, शुद्ध रामायण” | धिरज देशमुख यांची विरोधकांवर सडेतोड टोला
05:39
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा शंखनाद! बाबासाहेब पाटील, धीरज देशमुख मैदानात
01:40:24
Video thumbnail
LIVE "लातूर बँकेत मोठी राजकीय खेळी! बाबासाहेब पाटील अन् धीरज देशमुख एकत्र!"
01:03:28
Video thumbnail
Mahur|एमटीडीसी रस्ते बांधकामावर भीषण दुर्घटना | २० वर्षीय मजुराचा मिक्सर मशीनखाली मृत्यू
01:33
Video thumbnail
Latur|कुरियर बॉक्स स्फोटातील नागनाथ स्वामी यांचा मृत्यू | पाच दिवसांची झुंज संपली
02:44
Video thumbnail
Latur|मनपात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन | किमान वेतन आणि दिवाळी बोनसची मागणी
03:57
Video thumbnail
Latur Diwali Travel Ticket Rates|खासगी बसकडून अवाजवी तिकीट दर आकारल्यास तक्रार करा | RTO चे आवाहन
02:55
Video thumbnail
Latur Loan Recovery|कर्जवसुलीच्या छळातून आत्महत्येचा आरोप; सावकार शहाणवाज पठाण अटकेत
03:39
Video thumbnail
Nanded Loan Recovery|दुष्काळात कर्जवसुलीला छावा संघटनेचा विरोध | चिंचोली गावातील घटना
04:55

Latest news