30.4 C
Latur
Friday, February 13, 2026
Homeलातूरकाँग्रेसला शिरूर अनंतपाळचा कौल; जनतेचा स्पष्ट पाठिंबा : जे. जी. सगरे

काँग्रेसला शिरूर अनंतपाळचा कौल; जनतेचा स्पष्ट पाठिंबा : जे. जी. सगरे

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या बाजूने जनमत स्पष्टपणे झुकले असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसलाच जनता कौल देणार असल्याचा ठाम विश्वास काँग्रेसचे जेष्ठ नेते जे. जी. सगरे यांनी व्यक्त केला. तालुक्यातील येरोळ गट, गणात काँग्रेस उमेदवारांना मिळणारा वाढता प्रतिसाद हे त्याचे ठळक उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

विकास, शेतकरी, युवक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसने नेहमीच ठोस भूमिका घेतली आहे मात्र सत्ताधारी पक्षांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने जनतेत नाराजी असून, त्याचा थेट फायदा काँग्रेसला होत असल्याचे सगरे यांनी नमूद केले. गावागावातील प्रचारफे-या, बैठका व जनसंवादातून मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्व आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून काँग्रेसकडेच जनता पाहत आहे. त्यामुळे येणा-या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना भरघोस मताधिक्याने विजयी करणार असल्याचा विश्वासही जे. जी. सगरे यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी काँग्रेस नेते मधुकर आबा जाधव, प्रभाकर बंडगर, योगेश बिरादार, सुखदेव पाटील, दिलीप ढोबळे, रमेश सोनवणे, दिलीप गड्डीमे, जब्बार पटेल, नारायण कांबळे, जगदिश सुूर्यवंशी, पंडीत लवटे यांच्यासह येरोळ गट उमेदवार शितल रमेश सोनवणे, येरोळ गण उमेदवार अहिल्याबाई प्रभाकर बंडगर, हिप्पळगाव उमेदवार ज्ञानेश्वर पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR