काँग्रेस, महाविकास आघाडीसह पुरोगामी संघटनांचा आज ‘संविधान मार्च’

 लातूर : प्रतिनिधी
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीतून दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या जाहीर सभेनंतर करण्यात आलेल्या जातीयवादी  कृत्याविरोधात आज दि.  ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता लातूर शहरात काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष आणि विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने ‘संविधान मार्च’ काढून तीव्र निषेध आंदोलन छेडण्यात येणार आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार तसेच राज्याचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होणार असल्याची माहिती लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके आणि लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे अनुसूचित जाती प्रवर्गातून आलेले असून त्यांची संसदीय व राजकीय कारकीर्द तब्बल ५० वर्षांहून अधिक काळाची राहिलेली आहे. देशाच्या संसदेत आणि सार्वजनिक जीवनात अर्धशतकाहून अधिक काळ प्रामाणिक सेवा बजावणा-या एका दलित समुदायातील एवढ्या ज्येष्ठ व उत्तुंग  नेतृत्वालासुद्धा केवळ जातीय अभिनिवेशातून हीन वागणूक दिली जाते, ही बाब पुरोगामी भारतासाठी अत्यंत लांच्छनास्पद आहे. उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे खरगे यांच्या जाहीर सभेनंतर भाजप आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी त्या जागेचे तथाकथित ‘शुद्धीकरण’ करण्याचे विकृत कृत्य घडवून आणले. एका ज्येष्ठ दलित नेत्याच्या कार्यक्रमानंतर असे शुद्धीकरण करणे हे मानवीय दृष्टिकोनातून अत्यंत अशोभनीय, हीन आणि संविधानाची पायमल्ली करणारे आहे.
या उघड जातीयवादी आणि मनुवादी प्रवृत्तीचा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत परखड शब्दांत समाचार घेत दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु, जातीय सलोखा बिघडवणा-या त्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याऐवजी उत्तराखंडमधील भाजप सरकारच्या इशा-यावर काम करणा-या पोलिसांनी उलटा न्याय करत थेट राहुल गांधी यांच्यावरच हल्द्वानी येथील शहर कोतवाली पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला. सत्तेचा गैरवापर करून दलितांवरील अत्याचार आणि सामाजिक भेदभावाविरोधात उठणारा संविधानाचा आवाज दडपण्याचा हा भाजपचा निर्लज्ज प्रयत्न असल्याचा घणाघात काँग्रेसने केला आहे.
या सरकारी सूडबुद्धीचा आणि जातीयवादी मानसिकतेचा तीव्र निषेध करण्यासाठी आज सकाळी ११ वाजता ‘संविधान मार्च’चे आयोजन करण्यात आले आहे. हा मार्च भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू होईल आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी चौकात येऊन या मार्चचे रूपांतर भव्य निषेध सभेत होईल. या आंदोलनात काँग्रेस पक्षासोबतच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी, लातूर जिल्ह्यातील सर्व समविचारी व पुरोगामी सामाजिक संघटना, आंबेडकरी व लोकशाहीवादी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, काँग्रेसचे सर्व लोकप्रतिनिधी, फ्रंटल ऑर्गनायझेशन, विविध सेलचे प्रमुख, युवक काँग्रेस, एनएसयूआय, सेवादल, महिला काँग्रेसचे कार्यकर्ते, पुरोगामी संघटनांचे प्रतिनिधी आणि समस्त संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संविधान मार्चमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अभय साळुंके आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर यांनी केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|आदर्श संस्थेमधील घटनेवर भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी तीव्र प्रतिक्रिया
01:54
Video thumbnail
Nanded|लग्नाला नकार दिला अन् भररस्त्यात चाकू हल्ला! नांदेडमध्ये खळबळ
00:55
Video thumbnail
Latur|नाईस चायनीज सेंटरमध्ये तोडफोड; आरोपीला सोडल्याचा पोलिसांवर आरोप
03:21
Video thumbnail
Latur|SIR विरोधात महाविकास आघाडी आक्रमक; निलंग्यात ८ ऑक्टोबरला महामोर्चाची घोषणा
05:13
Video thumbnail
Latur|अल्पवयीन मुलींच्या शोषणाच्या आरोपाने लातूर हादरलं; नागरिकांचा मोर्चा
17:27
Video thumbnail
Latur|मध्यरात्री इलेक्ट्रॉनिक दुकान पेटलं; कोट्यवधींचं नुकसान!
03:11
Video thumbnail
Latur|विद्यार्थिनीची लैंगिक छळ प्रकरण!लातूरकर संतापले;आदर्श कॅम्पसवर दगडफेक
03:06
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
24:43
Video thumbnail
Latur|लातूरच्या गांधी मार्केट येथील इलेक्ट्रिक वास्तूच्या दुकानाला भीषण आग#Latur #fire
00:30
Video thumbnail
Latur|लातूर शहरात खुलेआम दादागिरी; चायनीज सेंटरमध्ये दुचाकी घुसवून नासधूस
00:39
Video thumbnail
Latur|लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ! विद्यार्थिनीचा विनयभंग;संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल
01:15
Video thumbnail
Latur|एकर सोयाबीन पावसाअभावी उद्ध्वस्त; केळगावच्या शेतकऱ्यांचा हृदय पिळवटून टाकणारा निर्णय
03:28
Video thumbnail
Latur|लातूर पोलिसांची दमदार कामगिरी; हरवलेले ५१ मोबाईल मूळ मालकांना परत
03:43
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथ गावात भीषण पाणीटंचाई; पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण
03:21
Video thumbnail
Nanded|नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी; चोरीला गेलेले ३०५ मोबाईल मूळ मालकांना परत
02:20

Latest news