30.4 C
Latur
Friday, February 13, 2026
Homeलातूरकाँग्रेस-वंचित आघाडीच्या यशाचा पानगावात जल्लोष

काँग्रेस-वंचित आघाडीच्या यशाचा पानगावात जल्लोष

रेणापूर : प्रतिनिधी
लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीने घवघवीत यश संपादन केल्याने रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे कॉग्रेस च्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उत्स्फूर्त आनंद साजरा केला. या यशाच्या आनंदात फटाके फोडून पेढे वाटण्यात आले.

लातूर महापालिकेत काँग्रेसझ्रवंचित आघाडीला मिळालेल्या जनतेच्या कौलाचे स्वागत करत पानगावातील कॉग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत विजयाचा जल्लोष केला. यावेळी शहरातील चौकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच उपस्थितांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड प्रमोद जाधव , कॉग्रेसचे प्रमोद कापसे, जेष्ठ नेते हरिश्चद्र लहाने, रेणा साखर कारखानाचे संचालक चंद्रचुड चव्हाण, माजी सुरेश लहाने, माजी जि.प.सदस्य ईश्वर गुडे , नगरसेवक सचिन मोटेगावकर यांच्यासह पानगाव
जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR