लातूर : प्रतिनिधी
माजी मंत्री आमदार अमित देशमुख व खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत लातुर शहरातील प्रभाग ११ मधील अपक्ष उमेदवार आनंद वैरागे, प्रभाग क्रमांक ६ मधील अपक्ष उमेदवार महोव घोडके यांनी आपल्या समर्थकांसह लातुर शहर महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला.
यावेळी महादेव घोडके यांची लातूर शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभाग सहसचिवपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते महादेव घोडके यांना नियुक्तीपत्र देवुन पक्ष कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंखे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, विद्याताई पाटील, हमीद शेख, बालाप्रसाद बिदादा, डॉ. अरविंद भातांबरे, अजगर पटेल, माधव गंभीरे, व्यंकटेश पुरी, प्रा. शिवाजी शिंदे, प्रा. गोविंद घार, प्रा. भालचंद्र येडवे, सिकंदर पटेल, अजित माने, चक्रधर शेळके, गोविंद सुरवसे, लक्ष्मण शिंदे, प्रवीण घोटाळे, गौस गोलंदाज, शफी टाके, अंबादास जाधव, ख्वॉजाबानू अन्सारी, केशरबाई महापुरे, शीतल मोरे, अजित नाईकवाडे, पंकज शेळके, मुकेश बिदादा, अविनाश बट्टेवार, राम स्वामी, रणधीर सुरवसे, फकीरा जोगदंड, राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे विविध सेलचे पदाधिकारी,कार्यकर्ते,प्रभाग ६ प्रभाग १६ आणि प्रभाग १७ व १८ मधील मतदार बंधू भगिनी, परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

