लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिका निवडणुक प्रचार सांगता सभेसाठी आपण सुफीया मस्जिद या ठिकाणी जमलो आहोत. आपल्याला आता १५ जानेवारीला काय करायचे आहे याचा आपला निर्णय झाला असेलच आणि आपण काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल यात शंका नाही, असे म्हणत आपण सर्वांनी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवाराना भरभरून मतरुपी आशीर्वाद द्यावेत आणि आपली सेवा व प्रभागाचा विकास करण्यासाठी विजयी करून लातुर महानगरपालिकेत पाठवावे, असे आवाहन त्यांनी प्रभागातील उपस्थित सर्व मतदार बंधू-भगिनींना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
येथील प्रभाग क्रमांक ४ मधील काँग्रेस व वंचित बहुजन अघाडीचे उमेदवार सचिन गायकवाड, गोरीबी बागवान, कौसर शेख, अहेमदखान पठाण यांच्या प्राचारार्थ सुफीया मस्जिद येथे दि. १३ जानेवारी रोजी आयोजित सभेत माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख बोलत होते. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, मुफ्ती वसीम सय्यद, काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस जितेद्र देहाडे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मोईज शेख, भाऊसाहेब आजबे, अॅड. संतोष सूर्यवंशी, कैलास कांबळे, डॉ. अंजूम कादरी यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना माजी मंत्री, आमदार अमित देशमुख म्हणले, प्रभाग क्रमांक ४ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.
या प्रभागाने लोकसभा, विधानसभा असो की, महापालिका निवडणुक असो नेहमीच काँग्रेस पक्षाला भरभरुन मतदान केलेले आहे. आता तर काँग्रेस सोबत वंचित बहूजन आघाडीही आहे. त्यामुळे या प्रभातील मतदार बंधु-भगिनी काँगे्रस-वंचितच्या उमेदवारांना मोठ्या मतांनी विजयी करतील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, मुफ्ती वसीम सय्यद, जितेंद्र देहाडे, संतोष सूर्यवंशी, भाऊसाहेब आजबे यांची भाषणे झाली. या सर्वांनी काँग्रेस-वंचित बहूजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

