कांदा महागला!; चाळीत ४० टक्केच साठा शिल्लक

लासलगाव : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या दराने पुन्हा एकदा साडेचार हजार रुपयांचा टप्पा ओलांडला असून, आगामी काळात कांद्याचे दर आणखी मजबूत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने दर नियंत्रणासाठी नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून राखीव कांदा दिल्ली, चेन्नईसह प्रमुख महानगरांमध्ये पाठवून बाजारातील पुरवठा वाढवला होता.

त्याचा परिणाम म्हणून मागील सप्ताहात कांद्याच्या घाऊक दरात क्विंटलमागे तब्बल ४०० ते ५०० रुपयांची घसरण झाली होती. मात्र, सरकारी हस्तक्षेपाचा परिणाम अल्पकाळ टिकला असून, चालू सप्ताहात कांद्याचे दर पुन्हा वाढले आहेत.
केंद्र सरकारने राखीव साठ्यातील कांदा ३५ रुपये किलो दराने महानगरांमध्ये उपलब्ध करून दिला. त्यामुळे बाजार समित्यांमधील कांद्याच्या दरावर दबाव निर्माण झाला. मात्र, यंदा केंद्र सरकारकडे राखीव कांद्याचा साठा कमी असल्याने आगामी काळात मोठ्या प्रमाणात सरकारी कांदा बाजारात आणणे शक्य होईलच असे नाही.

नाशिक जिल्ह्यात चाळींत साठवलेल्या उन्हाळ कांद्यापैकी ६० ते ६५ टक्के कांदा विकला गेला असून, सुमारे ४० टक्के साठा शिल्लक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यातच पावसामुळे चाळीत साठवलेल्या कांद्याची गुणवत्ता खालावत असल्याने काही कांदा खराब होत आहे.

त्यामुळे प्रत्यक्ष बाजारासाठी उपलब्ध होणारा कांद्याचा साठा आणखी कमी होण्याची शक्यता आहे. सध्याचा उपलब्ध साठा ऑक्टोबरच्या मध्यापर्यंतच पुरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर नवीन कांद्याची आवक अपेक्षित प्रमाणात झाली नाही, तर बाजारात कांद्याची उपलब्धता कमी होऊन दर वाढण्याची शक्यता आहे.

खरीप, रांगडा कांद्याला ‘अच्छे दिन’
नवीन खरीप तसेच रांगडा कांद्याच्या बाजारातील आवकेला विलंब होण्याची शक्यता असल्याने आगामी हंगामातील कांद्याला चांगला दर मिळण्याची शक्यता बाजारातील जाणकार व्यक्त करीत आहेत. मात्र, शेतक-यांनी केवळ दराच्या अपेक्षेवर अवलंबून न राहता दर्जेदार उत्पादनावर भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दर साडेचार हजारांच्या पुढे
सध्या कांद्याच्या दराने पुन्हा साडेचार हजारांचा टप्पा गाठला असताना, चाळीतील घटता साठा, खराब होणारा कांदा आणि खरीप कांद्याच्या लागवडीला झालेला विलंब या तीन घटकांमुळे आगामी एक ते दीड महिना कांदा बाजारासाठी अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

कांदा टप्प्याटप्प्याने बाजारात आणावा
या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेने शेतक-यांना कांदा विक्रीची घाई न करण्याचे आवाहन केले आहे. शेतक-यांनी उपलब्ध कांद्याचा साठा आणि बाजारातील आवक लक्षात घेऊन नियोजनबद्ध विक्री करावी. संपूर्ण कांदा एकाच वेळी बाजारात आणण्याऐवजी टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करावी, असा सल्ला संघटनेने दिला आहे. शेतक-यांनी शक्यतो कांदा कृषि उत्पन्न बाजार समितीत आणून लिलावाच्या माध्यमातून विक्री करावी, असा सल्लाही संघटनेने दिला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
गतवर्षी अति पावसामुळे कापसाच्या वाती तर यावर्षी वाती साठी देखील कापूस नाही
02:01
Video thumbnail
Latur|अवैध सावकारीला लगाम घालण्यासाठी लातूर पोलिसांचे मोठे पाऊल!
03:48
Video thumbnail
Latur|१२ ऑक्टोबरला प्राध्यापकांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन
06:43
Video thumbnail
Latur|विहिरीत मुबलक पाणी, पण नळ कोरडेच! जलजीवन योजनेचा उदगीरमध्ये बोजवारा?
04:19
Video thumbnail
Nanded|भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ! साड्यांसाठी महिलांची झटापट
01:01
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54

Latest news