लातूर : प्रतिनिधी
गेल्या दहा वर्षात भाजपने जनतेची फसवणूक केली. शेतीमालाला भाव दिला नाही, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट केले नाही, आनंदाच्या शिधात पाम तेल दिले मग भारताच्या शेतक-यांच्या शेतीमालाला कसा चांगला भाव मिळेल असे सांगून गुजरात मधून कांदा निर्यात केला जातो, मग महाराष्ट्रातून व इतर राज्यातून का केला जात नाही, असा प्रश्न राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केला.
शिरूरअनंतपाळ शहरातील महात्मा बसवेश्वर चौक येथे लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, सरचिटणीस मोईज शेख, सचिव अभय साळुंके, लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ंिलबन महाराज रेशमे, शोभताई बेंजरगे, निलंगा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे निरीक्षक संतोष देशमुख, जिल्हा काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ अरंिवंद भातांबरे, माजी सभापती अजित माने, शिरूर अनंतपाळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, एल बी आवाळे, हरिभाऊ गायकवाड, हरिराम कुलकर्णी, सुतेज माने, भागवत वांगे, बसवराज मठपती, मोहनराव भोसले, सरोजाताई गायकवाड, माणिक गायकवाड, बाबुराव धोंडे, चक्रधर शेळके यांच्यासह काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, कोरोनाचे संकट खुप मोठे होते. या कठीण काळात आपण सर्वांनी कोरोना संकटावर मात केली. या काळात मी वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना शिरूर अनंतपाळ आणि या परीसरात विशेष लक्ष दिले. येथील आरोग्य व्यवस्थेची आम्ही पाहणी केली, आढावा घेतला. येथे आवश्यक आरोग्यसुवीधा तातडीने पुरविल्या, कोरोना संकटावर मात करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले असे ते म्हणाले. लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे शिरूर अनंतपाळ तालुक्याचे भूमिपुत्र आहेत भाजपाचे जे खासदार आहेत पाच वर्षात येथे ते फिरकले नाहीत. आता मतदारानी महाविकास आघाडीला राज्यात व देशात इंडिया आघाडीला विजयी करण्याचा निश्चय केला आहे. असे त्यांनी सांगितले.
आम्ही शिरूर अनंतपाळ तालुक्याचा विकासाचा बॅकलॉग भरुन काढू, निलंगा विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांंनी मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीत ५००० तरुणांना रोजगार देणार असे म्हणून त्यांची नावे गोळा केली अजूनपर्यंत त्यांना नोक-या मिळाल्या नाहीत, त्यांची फसवणूक केल्याचे सांगून आमदार देशमुख म्हणाले की, महात्मा बसवेश्वर यांची जयंती शासकीयस्तरावर साजरी करण्याचा निर्णय लोकनेते विलासराव देशमुख यांनी घेतला. त्यानंतर तो कर्नाटक सरकारने निर्णय घेतला, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांना निवडून द्या आपला उमेदवार डॉक्टर आहे तर भाजप उमेदवार कंत्राटदार आहे. डॉक्टर काळगे यांची मतदारसंघात हवा आहे या निलंगा विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर काळगेना सर्वाधिक लीड द्या असे सांगून, येत्या ७ मेला लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावासमोरील हात चिन्हाचे बटन दाबून त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर म्हणाले की, काँग्रेस पक्षाने देशाचा विकास केला आहे. लातूर जिल्ह्याचे नेतृत्व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांनी करून लातूर जिल्ह्याचा विकास केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने १५ लाख रू नागरिकांना देतो म्हणाले ते दिले नाहीत. शेतक-यांंची कर्जमाफी केली नाही, दोन कोटी बेकारांना नोकरी दिल्या नाहीत. भाजपने जाती-जातीत भांडणे लावली, ही शेवटची निवडणूक व शेवटचा मतदानाचा अधिकार आहे भाजप संविधान बदलणार आहे असे सांगून येत्या ७ मेला लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावासमोरील हात चिन्हाचे बटन दाबून त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, शोभाताई बेंजरगे, अजित माने, संजय शेटे, मोइज शेख यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन संजय बिरादार यांनी केले तर आभार सुतेज माने यांनी मानले.