परभणी : परभणी जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे. जिल्ह्यातील मानवत, सेलू, परभणी या ठिकाणी कापसाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. या ठिकाणच्या कापूस गाठी घेऊन दि. १ मे रोजी रेल्वे मालगाडी पंजाबकडे रवाना झाली.
परभणी जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे.
परभणी, मानवत, सेलू या ठिकाणी कापसाची मोठ्या प्रमाणात आवक होते. कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस खरेदी सुरू आहे. जिल्ह्यात सुपीक जमीन असल्याने दर्जेदा कापूस उत्पादन होते. कापसाचा मोठा धागा शेतक-यांना मिळतो. तो पुढील कापड उद्योगासाठी अत्यावश्यक ठरतो.
या पार्श्वभूमीवर पंजाब येथील ऋषभ स्पिनिंग मिल जि. लुधियाना आणि नाहर स्पिनिंग मिल जि. सासनगर यांनी परभणीतील कापूस गाठींची खरेदी केली आहे. या कापसाच्या गाठी घेऊन रेल्वे मालगाडी पंजाबच्या दिशेने रवाना झाली. यामुळे जिल्ह्याच्या अर्थ कारणाला चालना मिळणार आहे. तसेच या माध्यमातून रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत.
















