Homeलातूरकामगार हिताचे कायदे रद्द करून केली कामगारांची मुस्कटदाबी

कामगार हिताचे कायदे रद्द करून केली कामगारांची मुस्कटदाबी

लातूर : प्रतिनिधी
महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण मेघाजी लोखंडे यांच्या परिश्रमातून कामगारांच्या हिताचे झालेले कायदे आजचे भाजपचे केंद्र आणि राज्यातील सरकार कामगार कायदे रद्द करून कामगारांना गुलाम करून त्यांची मुस्कटदाबी करत आहे. त्याविरोधात कामगारांनी पेटून उठण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी लातूर येथे केले.
येथे अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या ३ मे रोजी स्व. दगडोजीराव देशमुख सभागृहात आयोजित जिल्हा कामगार मेळाव्यात हनुमंत पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी मंगलताई शिंदे या होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून केरळचे सनदी अधिकारी कन्नन गोपीनाथ नायर, असंघटीत कामगार कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष तथा पुणे मनपाचे नगरसेवक सुनील शिंदे, अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार होळीकर,  भटक्या विमुक्ताचे नेते प्रा. सुधीर अनवले,  नूतन अंगरखे,महाराष्ट्र  विकास आघाडीचे बसवंत उबाळे, इंजि. शेख शफी,  शिवाजी भंडारे, सुरेश काटे आदींची प्रमुख उपस्थिती होत.ी जनता म्हणजे आपली प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल. सध्या दोन विचारधारांची लढाई आहे. देशाच्या प्रगतीच्या विरोधात केंद्र सरकार व्हीलन आहे, असे मत कन्नन गोपीनाथन यांनी व्यक्त केले. तसेच सुनील शिंदे यांनी कामगारांना सविस्तर मार्गदर्शन केले. राजकुमार होळीकर यांनी आपल्या प्रस्ताविकात कामगार कायदे, आजची आव्हाने याबद्दल सविस्तर सांगितले.
सूत्रसंचालन अ‍ॅड. शिरीष दहिवाल यांनी केले. मेळाव्यासाठी प्रमोद बनाटे, किशोर सगर, भागवत पांचाळ, नेताजी बनसोडे, बळीराम कांबळे, राजाभाऊ वटनुरे, अंजली येदले, अंजनाताई सगट, अंकुश टकळगे, रेणुकाताई कांबळे, सुषमाताई मिटकरी, राजकुमार भंडे, सुधीर कांबळे, लहू जगताप, पंडित गायकवाड, गौतम ससाणे, सिकंदर लोखंडे, परमेश्वर कांबळे, राणी लोढा, प्रल्हाद कलवले आदिनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR