किल्लारी : वार्ताहर
किल्लारी येथून जवळच असलेल्या कारला (तालुका औसा) येथील शिवारातील विश्वास शाहूराज काळे यांचे सर्वे नंबर ११६ मधील ४ एकर ऊसापैकी सव्वा एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला. या घटनेत वा-यामुळे शॉर्ट सर्किट होऊन ऊस जळून खाक होऊन दोन लाखाची नुकसान झाले आहे याबाबत विद्युत मंडळ किल्लारी, तलाठी लायक सय्यद व निळकंठेश्वर साखर कारखाना यांनी पंचनामा केला आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती झाली असून पाणी नाही पिके हातची गेली आहेत. नगदी पैशाचे पिके सोयाबीन, उडीद, तूर, मूग ही पिके डोळ्यादेखत वाळून गेली आहेत. अनेक शेतक-यांनी त्यावर रोटर फिरवला आहे. शेतक-यांनी काबाड कष्ट करून जगवलेला ऊसही विद्युत मंडळाच्या शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला आहे. यांची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन शेतक-यास आर्थिक सा करावे अशी शेतक-याची मागणी आहे.
















