पंढरपूर : प्रतिनिधी
कार्तिकी एकादशीला विठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याच्या मान राज्याच्या उपमुख्यमंत्री यांना देण्यात येत असतो. मात्र राज्यात सध्या दोन मुख्यमंत्री असल्याने यंदाची महापूजा नेमकी कोणाच्या हस्ते करायची याचा पेच निर्माण झाला होता. मात्र यावर निर्णय घेत यंदाच्या महापूजेचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
आषाढी एकादशी नंतर येत असलेल्या पंढपूरच्या प्रमुख यात्रेपैकी एक असलेल्या कार्तिकी एकादशी पंधरा दिवसांवर आहे. कार्तिकी एकादशीला शासकीय महापूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्री यांना देण्यात येत असतो. मात्र राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने यंदाच्या कार्तिकी एकादशीला महापूजेचा मान देण्यासंदर्भात विठ्ठल मंदिर समितीने शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले होते. यानंतर याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
शासनाचे परिपत्रक प्राप्त झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देऊन कार्तिकी एकादशीच्या महापूजेला येण्याचे निमंत्रण दिले आहे. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान केला. यामुळे यंदाच्या कार्तिकीला उपमुख्यमंत्री शिंदे हे महापूजा करतील.
दरम्यान, राज्यात अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे यंदाच्या कार्तिकीची शासकीय महापूजा कोणाच्या हस्ते होणार याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान राज्य शासनाने तसे परिपत्रक काढून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

