कार्यकर्त्यांची गद्दारी खपवून घेणार नाही

निलंगा : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत काही जणांनी न कळत तर काहींनी ठरवून गद्दारी केली. त्या सर्वांना माफ केले मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आहेत. पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे पैसे घामाच्या कष्टाचे आहेत. त्यांच्या निवडणुकीत जीव ओतून आम्ही काम करणार आहोत. त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी रक्ताचे पाणी करू मात्र या निवडणुकीत जर कोणी गद्दारी करण्याचा प्रयत्न केला तर खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात दिला.
      निलंगा येथील वृंदावन मंगलकार्यालयात आयोजीत मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर खासदर डॉ. शिवाजीराव काळगे, जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख, प्रदेश सचिव श्रीशैल उटगे, प्रदेश सचिव कल्याण पाटील, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन मानकरी, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद भातांब्रे, माजी जि.प उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, माजी जि प उपाध्यक्ष भगवानराव पाटील तळेगावकर, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, निलंगा तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, देवणी तालुकाध्यक्ष अ‍ॅड अजित बेळकोणे, माजी प.स.सभापती अजित माने, माजी सभापती राम गायकवाड, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, शहराध्यक्ष अजित नाईकवाडे, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष प्रविण सूर्यवंशी, आंबादास जाधव, लाला पटेल, किशोर कारखाने, पंकज शेळके, शकील पटेल, रजनीकांत कांबळे, विलास सुर्यवंशी, अजित निंबाळकर, महेश देशमुख, महेश म्हेत्रे, सोनू डगवाले हे उपस्थित होते.
अभय साळुंके म्हणाले की, आमदारांनी विकासाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार केला. एकाच रस्त्यावर अनेकदा रस्ते करुन बील लाटण्याचे काम केले. आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतमध्ये काम करताना आडचण निर्माण केली. या आडचणीतून मुक्त करण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकावणे आवश्यक असून तीन्ही तालुक्यातील सर्वच ठिकाणी काँग्रेस आपला झेंडा रोवेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
       यावेळी प्रा. रमेश मदरसे, विठ्ठल पाटील, मिथुन दिवे, बालाजी गोमसाळे, गंगाधर चव्हाण, किरण पाटील, प्रमोद मरुरे, शाहीद लाला पटेल, बबलू जाधव, हाजी सराफ, दिलीप ढोबळे, बालाजी वळसांगवीकर, सुतेज माने, बाळू पाटील, गिरीश पात्रे, मालबा घोणसे, गोविंद सुर्यवंशी, विकास पाटील, विलास कांबळे, धनाजी चांदुरे, राम भंडारे, संजय बिराजदार, पिराजी साबळे, शरद देशमुख, रमाताई टोंपे, किशोर टोंपे, सिराज देशमुख, अजगर अन्सारी, दत्ता देशमुख, पंडितराव रणखांब, मदन बिरादार बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रविण सोळुंके, अ‍ॅड तिरुपती शिंदे, अ‍ॅड संदीप मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44

Latest news