26.9 C
Latur
Thursday, January 22, 2026
Homeमनोरंजनकिरण राव रुग्णालयात दाखल

किरण राव रुग्णालयात दाखल

मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूड अभिनेता आमिर खान कायम त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत असतो. आता आमिर खानची दुसरी बायको किरण रावला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किरण राववर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे. किरण रावची अपेंडिक्स सर्जरी करण्यात आली आहे. किरण रावने हॉस्पिटलमधून तिचे हेल्थ अपडेट्स दिले आहेत.

किरण रावने तीन फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत तिने तिच्या हॉस्पिटल रूममधून बाहेरचा निसर्ग दाखवला आहे. पहिल्या फोटोत सेल्फी पोस्ट केली आहे. दुस-या फोटोत तिच्या हातातला हॉस्पिटल बँड दिसत आहे. ज्यावर किरण आमिर राव खान असे लिहिले आहे. तिस-या फोटोमध्ये किरण राव हेल्दी खाताना दिसत आहे. तिने या पोस्टला एक कॅप्शन देखील लिहिले आहे. कॅप्शमध्ये तिने हॉस्पिटलच्या स्टाफ आणि डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

किरण रावला शस्त्रक्रियेनंतर डिस्चार्ज मिळाला आहे. ती घरी गेली आहे. तसेच ती नवीन वर्षाचे स्वागत करायला तयार असल्याचे किरण रावने सांगितले. किरण रावने शेअर केलेल्या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट्स करून तिच्यासाठी काळजी व्यक्त करताना दिसत आहेत. २०२४ मध्ये रिलीज झालेला किरण रावचा ‘लापता लेडीज’ चित्रपट खूप गाजला.

आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्तासोबत झाले असून त्यांचा घटस्फोट २००६ मध्ये झाला. त्यानंतर आमिर खानने चित्रपट निर्माती किरण रावसोबत लग्न केले. यांचा घटस्फोट २०२१ मध्ये झाला. किरण रावसोबत घटस्फोटानंतर आमिर खान आता गौरी स्प्रॅटला डेट करत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR