किराणा वस्तूंच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ

नवी मुंबई : प्रतिनिधी
इंधन दरवाढ, वाहतूक खर्चातील वाढ, कच्च्या मालाचा वाढलेला खर्च आणि बाजारातील मागणी यामुळे गेल्या सहा महिन्यांत किराणा वस्तूंच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यातच डाळी, धान्ये, साखर, शेंगदाणे आणि खाद्यतेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे प्रत्येक कुटुंबाचा मासिक किराणा खर्च हजारो रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे जगणे नकोसे झाले आहे.

बाजारातील घाऊक व किरकोळ विक्रेत्यांच्या माहितीनुसार, मसूर डाळ, तूर डाळ, उडीद डाळ, चणा डाळ, मूगडाळ, हरभरा, चवळी, मटकी आणि वाटाणा यांच्या दरात ५ ते ३० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्याचबरोबर शेंगदाणे, गहू, तांदूळ आणि बाजरीच्या दरातही वाढ झाल्याने दैनंदिन आहार महागला आहे.

साखरेच्या किमतीत आठ रुपयांची वाढ झाल्याने चहा, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांच्या खर्चातही वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या बाजारातही तेजी कायम असून, सोयाबीन तेल, शेंगदाणा तेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमतीत १५ ते २० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे घरगुती स्वयंपाकाचा खर्च आणखी वाढला आहे.

नारळाच्या किमतीतही १० ते २५ रुपयांपर्यंत वाढ झाल्याने धार्मिक कार्यक्रम, सण-उत्सव आणि दैनंदिन वापरासाठीही अधिक पैसे मोजावे लागत आहेत. व्यापा-यांच्या मते, इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे मालवाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

त्याशिवाय काही भागांत झालेला कमी पाऊस, उत्पादनातील घट, साठेबाजीची शक्यता आणि वाढती मागणी यामुळे अनेक वस्तूंचे दर तेजीत आहेत. घाऊक बाजारातील वाढलेले दर थेट किरकोळ बाजारात पोहोचल्याने ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे. महागाईमुळे गृहिणींना घरखर्चाचे नियोजन करताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या महागाईविरोधात जनसामान्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

महागाईचा दर आणखी वाढण्याची शक्यता
पूर्वी महिनाभरासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी करणारी अनेक कुटुंबे आता आवश्यक तेवढ्याच वस्तूंची खरेदी करत आहेत. काहींनी महाग झालेल्या डाळी आणि खाद्यपदार्थांचा वापर कमी करण्यास सुरुवात केली असून, स्वस्त पर्यायांचा शोध घेतला जात आहे. मात्र इंधन दरात पुन्हा वाढ झाली किंवा पावसाचा परिणाम शेतीवर झाला, तर महागाई आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे व्यापा-यांनी स्पष्ट केले.

१ किलो साखर पन्नाशीपार
राज्यात साखरेच्या दराने उच्चांक गाठला आहे. साखर किरकोळ बाजारात ५५ पासून ६३ रुपये किलोने विकण्यात येत आहे. सणासुदीचे दिवस तोंडावर आल्याने साखरेच्या भावाने ‘भाव’ खाल्ला आहे. आता श्रावण तोंडावर आला आहे. घरात गोडधोड बनविले जाईल. मात्र, साखरेच्या भावाने उच्चांक गाठल्याने गृहिणींना आखडता हात घ्यावा लागणार आहे.

गुळाच्या दरातही वाढ
चांगल्या गुळाचा भाव ७०, ८० व १०० रुपये किलोच्यावर गेला आहे. साखरेऐवजी लोक गुळाचा वापर करत असल्याने गुळाचे भावही चांगलेच वाढले आहेत. महिनाभरातही साखरेच्या दरात प्रतिकिलो ४ ते ६ रुपयांची वाढ झाली आहे. साखर ३,८०० ते ४,००० रुपये क्विंटल होती, ती आता ४,३०० ते ४,५०० रुपये क्विंटलने मिळत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news