लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील खंडापूर अखंड हरिनाम सप्ताहातून ३ कोटी ६५ लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी अटकेत असलेला किशोर धोंडिराम जाधव महाराज शिवणीकरला आणखी ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे किशोर महाराजाचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
महिनाभरापासून किशोर धोंडिबा जाधव उर्फ किशोर महाराज शिवणीकर फरात होता. मोतीनगर येथील नव्या घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. १० जुलै रोजी त्याच्या घराचे अमेरिकन कंपनीची ३ कुलुपे तोडून किशोर महाराजास अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. कालावधी संपल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी किशोर महाराजाला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडीत पुन्हा ३ दिवसांची वाढ केली. यामुळे किशोर महाराजाचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
















