किशोर महाराजाला दीड कोटींच्या घराचा मोह नडला

लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील खंडापूर येथे २१ फेब्रुवारी ते २ मार्चदरम्यान झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहातून ३ कोटी ६५ लाख   रूपयांचा अपहार केल्या प्रकरणी किशोर धोंडीराम जाधव महाराज शिवणीकर व त्याच्या सहका-याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात जून महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. महिनाभरापासून किशोर धोंडीबा जाधव उर्फ किशोर महाराज शिवणीकर फरात होता. मोतीनगर येथील नव्या घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. १० जुलै रोजी त्याच्या घराचे अमेरिकन कंपनीचे तीन कुलूप तोडून किशोर महाराजास ताब्यात घेतले. किशोर महाराजाला दीड कोटींच्या घराचा मोह नडल्याने आज ते पोलीस कोठडीची हवा खात आहेत.
श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमण सोहळ्याच्या सांगते निमित्त तसेच श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळा दि. २१ फेब्रुवारी ते २ मार्चदरम्यान लातूर शहरापासून जवळच असलेल्या खंडापूर शिवारात झाला. संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज, संत जनाबाई यांच्यासह सात संतांच्या पवित्र पादुकाही हेलिकॉप्टरने येथे आणल्या होत्या. हजारों भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेत कोट्यावधी रुपयांचा निधी दिली. परंतू, संयोजन समितीतील पाच जणांनी या निधीचा अपहार केला होता. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात जुन महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गेल्या महिनाभरापासून फरार असलेला आरोपी किशोर महाराज शिवणीकर याने मोतीनगर लातूर येथे दीड कोटीचे नवीन घर घेतले. या घरात ते वास्तव्यास असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकामधील पथकाने घर भाडयाने राहण्याच्या बहान्याने ते घरात दाखल झाले. मात्र वरच्या मजल्यावरील घर दाखवण्यास यावेळी टाळाटाळ करताच पोलिसांनी चावी बनवणा-यांना बोलवले. घराला अमेरीकन कंपीनेचे कुलूप लावले होते. तीन कुलूप उघडून दुस-या मजल्यावरून किशोर महाराज शिवाणीकर यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलिसांकडे सुपूर्द केले.
लातूरच्या अधी सहा ठिकाणी वारकरी संप्रदायाचे सोहळे झाले. त्या ठिकाणच्या सोहळ्यात एका पैशाचाही अपहार झालेला नाही. लातूरमध्ये मात्र संयोजन समितीनेच अपहार केला. त्यानंतर दि. ३० एप्रिल रोजी  ज्ञानेश्वर विठ्ठल कदम उर्फ ह. भ. प. छोटे कदम माऊली महाराज, ह. भ. प. माणिक महाराज मोर यांनी लातूरच्या शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेवून किशोर महाराज जाधव-शिवणीकर आणि बजरंग काबरा, सागर डामगिरे, बालाजी भोसले, ज्ञानोबा भिसे हे त्यांचे चार साथीदार यांनी निधी, देणग्या गोळा केल्या. परंतु, त्याचा हिशोब दिला नाही. ट्रस्ट स्थापन करण्यासाठी काही जणांच्या को-या कागदावर स्वाक्ष-या घेतल्या, ट्रस्ट स्थापन केली नाही, असा आरोप केला होता.
सात दिवस चाललेल्या या सोहळ्यात राज्यातून आणि राज्या बाहेरूनदेखील भाविकांनी गर्दी करत कोट्यावधिचे दान दिले होते, मात्र भाविकांच्या दिलेल्या दानावर डल्ला मारून कोट्यावधी रुपये घेऊन किशोर महाराज शिवणीकर फरार झाला आणि कांही दिवसातच लातूर शहरातील मोतीनगर भागात किशोर जाधव शिवणीकर याने दीड कोटींचा आलिशान बंगला घेतला. खंडापूर गावातील भाविकांनी त्याला हिशोब विचारला असता पिस्तूल हातात घेतलेला फोटो स्टेटसला ठेऊन ग्रामस्थांना धमकावण्याचा प्रयत्न किशोर जाधव शिवणीकर याने केला, दरम्यान किशोर जाधव याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील किशोर शिवणीकर पोलिसांच्या हाती लागत नव्हता, मात्र अखेर लातुरातील दीड कोटींच्या बंगल्यात किशोर जाधव आल्याची माहिती स्थानिक  गुन्हे शाखेला मिळाल्या नंतर पोलिसांनी मोठया शीताफीने किशोर जाधवला अटक केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news