कुंभमेळ्यासाठी बोगस बंपर भरती; अनेक बेरोजगारांना गंडा

नाशिक : प्रतिनिधी
कुंभमेळ्याच्या सुमारे साडे पाचशे कोटी रूपयांच्या बनावट वर्क ऑर्डरचे प्रकरण ताजे असतानाच आता भरतीच्या नावाने गंडा घालण्याचा प्रकार उघड झाला आहे. सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत आरोग्य विभागात बंपर भरती असल्याचा बनाव रचून बेरोजगार तरुणांची आणि शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर खोटी जाहिरात प्रसारित केल्याप्रकरणी ‘हेलफोर्स फाऊंडेशन मल्टी सर्व्हिस’ या संस्थेच्या अध्यक्षांसह तिघांवर नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांच्या स्वाक्षरीच्या बनावट वर्क ऑर्डरचे प्रकरण नुकतेच उघड झाले. याप्रकरणी नाशिक, मालेगाव येथील पाच जणांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. त्याचा तपास सुरू असतानाच नव्याने असा प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार डॉ. योगेश चित्ते यांनी या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून संस्थेचा अध्यक्ष सचिन शिंदे (रा. देवळा), सचिव निलेश घोलप (रा. कळवण) आणि उपाध्यक्ष विक्रांत सूर्यवंशी (रा. पेठ रोड) या तिघा संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुनील पवार करीत आहेत. शासनाची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना या भरतींची जाहिरात सोशल मीडियावर प्रसारित करून अनेक बेरोजगारांची दिशाभूल केल्याचे त्यातून स्पष्ट झाले.

सदर कार्यालय गेल्या काही महिन्यांपासून या इमारतीत कार्यरत होते, कार्यालयाबाहेर असलेल्या फलकावर आरोग्यविषयक सेवा देण्याचा उल्लेख होता. मात्र ऑनलाइन जाहिरात करताना सिंहस्थाचा लोगो वापरल्याने त्याला भुलून काही नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क केला का, त्या नागरिकांकडून या तिघांनी पैसे घेतले का, घेतले असतील तर किती जणांची त्यात फसवणूक झाली याबाबत पंचवटी पोलिसांनी तिघांची चौकशी सुरू केली आहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया आणि विविध माध्यमांवर नोकरभरतीबाबतच्या अफवा पसरवल्या जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. कुंभमेळ्याच्या नावाखाली कायमस्वरूपी नोकरभरतीचे खोटे आणि फसवे दावे करून नागरिकांची दिशाभूल करणा-या भामट्यांवर थेट गुन्हे दाखल केले जातील. शासनाकडून कायमस्वरूपी भरती केली जात नसून, नागरिकांनी अशा फसव्या जाहिरातींना बळी पडू नये.

सोशल मीडियावर बोगस जाहिरात
सिंहस्थ कालावधीत आरोग्य विभागात भरती होणार असल्याचे भासवत सोशल मीडियावर याप्रकरणी फिरत असलेली जाहिरात आरोग्य विभागातौल अधिका-यांच्या लक्षात आली. त्यानुसार त्यांनी सदर जाहिरात आणि कार्यालयाची खात्री करून त्याबाबत वरिष्ठांना सतर्क केले. संशयितांनी पेठ रोड परिसरात भाड्याने कार्यालय सुरू केले होते. तिथे २०२६-२७ च्या कुंभमेळ्यात आरोग्य विभागात विविध पदांची भरती असल्याचे भासवण्यात आले. मात्र आरोग्य विभागामार्फत सिंहस्थात अशा प्रकारची कोणतीही भरती नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर हा प्रकार उघड झाला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13
Video thumbnail
BIG BREAKING | तिरुका नदीत जळकोटच्या व्यक्तीचा मृतदेह; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
00:57
Video thumbnail
SOLAPUR|पडळकरांचा ताफा अडवला! मराठा आंदोलकांचा थेट सवाल; आरक्षणावर आमदारांनी स्पष्ट केली भूमिका
01:42
Video thumbnail
LATUR|गवळणीच्या सुरांनी लातूर दुमदुमलं! वासुदेव समाजाचा जन्माष्टमी सोहळा थाटात
03:55
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
08:14
Video thumbnail
BIG BREAKING | लातूर ट्रॅफिक पोलिसांचे मिशन ऑल आऊट! फटाका सायलेंसर, रॉंग साईड, मोबाईलवर कारवाई
02:01
Video thumbnail
BIG BREAKING | लातूर पोलिसांचा धडाका! ५९ हरवलेले मोबाईल शोधून मालकांना परत
03:31
Video thumbnail
Nanded Maratha Protest|मराठा रॅलीत आमदारांना धक्का! घोषणाबाजीनंतर काढता पाय
02:26
Video thumbnail
Latur|ऑक्टोबरमध्ये रंगणार थरार; लातूरच्या खेळाडूंची तयारी पाहा
03:24
Video thumbnail
Latur | लांबच्या प्रवासातील महिलांचे हाल संपणार? पेट्रोल पंपांवर स्वच्छ शौचालयांसाठी मोठा पुढाकार
05:46
Video thumbnail
BIG BREAKING | मराठा आरक्षणासाठी बोरगाव काळेत उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाचा निर्धार
00:32
Video thumbnail
BIG BREAKING | नांदेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद! सकाळपासून बाजारपेठा बंद, मराठा समाजाची मोठी रॅली
00:51

Latest news