नांदेड: प्रतिनिधी
कु-हाडीने घाव घालून एका युवकाची निर्घृण हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री १०.३० वाजता घडली. या घटनेमुळे पुन्हा एकदा नांदेड शहर हादरले आहे. सांगवी पुलाजवळ घडलेली ही घटना प्रेम प्रकरणातून घडला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी ५ संशयितांना ताब्यात घेतले आहे. हत्येच्या या घटनेने नांदेड शहर पून्हा हादरले आहे.
शहरात गेल्या काही महिन्यांपासून गंभीर गुन्ह्यासोबत हत्यांचे सत्र सुरू आहे. डी मार्ड परिसरातील टोळी युद्ध, सोनू कल्याणकर हत्या, वाघी रस्त्यावर घटना आणि वजीराबाद, नांदेड ग्रामीण हद्दीतही हत्यांच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. ही भिती कायम असतांनाच आसना पुलाजवळ झालेल्या हत्येच्या घटनेमुळे नांदेड शहर पून्हा हादरले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, नमस्कार चौक ते सांगवी दरम्यान असलेल्या नुरी चौक येथील मयत सचिन यशवंत काळे वय ३० हा रहिवाशी आहे. शुक्रवार दि. १० जुलै रोजी रात्री १०.३० च्या सुमारास काही युवकांनी दारू पिण्याच्या बहण्याने सचिन यास घरा बाहेर बोलावून घेतले. यानंतर आसना पूल परिसरात नेले, तेथे जुन्या वादातून बाचाबाची झाली. येथेच त्याच्यावर सोबतच्या ५ युवकानी कु-हाडीने घाव घातले. गंभीर जखमी झालेल्या सचिन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्यासह विमानतळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेंडग व सहका-यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेची चौकशी करून अवघ्या काही तासातच पोलिसांनी ५ त्या ५ संशयितांना ताब्यात घेतले. सदर प्रकरणाची चौकशी पोलीस करत असून खुणाचा प्रकार अत्यंत गंभीर असून मयताच्या मानेला व डोक्यात कु-हाडीचे जबर घाव घालण्यात आल्याचे दिसून येत होते. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना ही एका आरोपीच्या पुतणीसोबत प्रमेम संबध असल्याच्या संशयातून घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले
मारेक-यांचा निष्पन्न करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळाजवळील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. त्याच्या आधारे संशयितांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिकांकडूनही माहिती संकलित केली जात आहे.
















