कृषिआधारित उद्योगामुळेच देश भविष्यात प्रगत राष्ट्र म्हणून नावारु पाला येईल

लातूर : प्रतिनिधी
लातूर हे शिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे. कृषि शिक्षणासाठी लातूर महाविद्यालयाचा सर्वदूर लौकिक आहे. यासोबतच कृषि महाविद्यालयाने पर्यावरणसंरक्षण, वृक्षलागवड, जलसंधारण या बाबतीत केलेल्या कार्याचा आज देशपातळीवर गौरव केल्या जात आहे. या महाविद्यालयाचे विद्यार्थी आज देशात प्रशासकीय सेवा, स्वयंउद्योग, व्यापार यामध्ये कार्यरत असून ते यशस्वी वाटचाल करीत आहेत. यामुळे अधिकाधिक विद्यार्थी आज कृषिक्षेत्राकडे वळत आहेत हि देशाच्या कृषिक्षेत्रासाठी व समाजासाठी अभिमानाची बाब आहे. कृषिक्षेत्राचा आजही देशाच्या जीडीपी मध्ये मोलाचा वाटा असून कृषिशिक्षण व कृषिआधारित उद्योगामुळेच देश भविष्यात प्रगत राष्ट्र म्हणून नावारूपाला येईल, असे उद्गार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे  शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी काढले.
कृषि महाविद्यालय, लातूर तत्कालीन सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे  संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषि) या पदावर रुजू झाल्यामुळे त्यांचा महाविद्यालयातर्फे सत्काराचे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवन, इतिहास अभ्यासक डॉ. सोमनाथ रोडे, पत्रकार जयप्रकाश दगडे, पत्रकार अरुण समुद्रे,अधिष्ठाता, डॉ.दिगंबर पेरके, सहयोगी अधिष्ठाता डॉ. अच्युत भरोसे, प्राचार्य डॉ. संतोष कांबळे, डॉ. सचिन मोरे, डॉ. मोहन धुप्पे,  डॉ. वसंत सूर्यवंशी, पत्रकार आनंद माने, योगीराज पिसाळ, प्राचार्य डॉ. सुर्यकांत उगिले, यांची प्रमुख उपस्थिती होते.
यावेळी डॉ. रोडे यांनी डॉ बाबासाहेब ठोंबरे हे एक पारदर्शक, दूरदृष्टी असलेलं  व्यक्तिमत्व आहे असे सांगितले. जयप्रकाश दगडे, अरूण समुदे यांनीही विचार  मांडले.  यावेळी डॉ. पेरके म्हणाले, डॉ. ठोंबरे यांनी दिलेल्या मार्गावरून भविष्यातही हे महाविद्यालय यशस्वीपणे वाटचाल करेल, अशी भावना व्यक्त केली. याप्रसंगी परभणी येथे बदलीने रुजू झालेले क्रीडा शिक्षक डॉ. संघर्ष शृंगारे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धांमध्ये बक्षीस, पदक प्राप्त झाल्याचे उपस्थितांनी आवर्जून नमूद केले. या कार्यकमाचे प्रास्ताविक डॉ. विजय भामरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. दयानंद मोरे, तर आभार डॉ. ज्योती देशमुख यांनी मानले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news