लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त कृषि उत्पन्न बाजार समितीचे नविन गुळ मार्केट जनावर बाजार आवारात विविध प्रकारच्या १०१ वृक्षांची लागवड शनिवारी बाजार समितीचे सभापती जगदिशराव बावने यांच्या हस्ते व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण पाटील, युवराज जाधव, श्रीनिवास शेळके, आनंद पाटील, आनंद पवार,अनिल पाटील, सचिन सुर्यवंशी, डॉ. बालाजी वाघमारे, सुभाष घोडके, तूकाराम गोडसे, शिवाजी देशमुख, बालाप्रसाद बिदादा, सुधीर गोजमगुंडे, शिवाजी कांबळे, लतिका सुभाष देशमुख, सुरेखा बळवंत पाटील, सचिव अरविंद पाटील, सहा.सचिव सतिश भोसले, श्रीगणेश रुकमे, बालाजी किसवे, राजपाल पाटील, विनोद नकाते, उषा निचळ यांच्यासह विविध खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

