शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यातील कृषी निविष्ठा (बियाणे, खते, औषधे) विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे बंद ठेवण्यात आली असून शेतक-यांना आवश्यक निविष्ठा मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. कृषी निविष्ठा व्यावसायिक संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी शासनाने व्यवसायातील अडचणी तात्काळ दूर कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
परवाना नूतनीकरण प्रक्रिया सुलभ करण्यात यावी, कंपन्याकडून रासायनिक खताचा पुरवठा होताना होत असलेली लिविंग बंद व्हावे, साधी पोर्टलची वापराची सक्ती बंद करावी एफ ओ आर पद्धतीने खताचा पुरवठा करण्यात यावा, जीएसटीच्या कायद्याप्रमाणे शून्य टक्के दराने खतांची विक्री मार्जिन मिळावी, विक्री केंद्राची तपासणी करणा-या अधिका-यांची संख्या कमी करावी खरीप हंगाम २०२६ मध्ये युरिया व डीएपी खतांच्या बाबतची कार्यपद्धती सूचना परिपत्रकाच्या अंमलबजावणी करताना संघटनेची चर्चा करावी मुदतबा कीटकनाशके कंपन्यांनी परत घ्यावे, केंद्र शासनाचे कृषी विभागाकडून नवीन बियाणे कायदा २०२५ मधील विक्रेत्यांसाठी प्रास्ताविक जाचक नियम शिथिल व्हावेत आदी मागण्यांसाठी हा बेमुदत बंद करण्यात आला आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष बसवराज एरंडे यांनी सांगितले की, सध्या कठोर नियम व तांत्रिक अडचणींमुळे व्यवसाय करणे अवघड झाले आहे. त्यामुळे शासनाने सकारात्मक भूमिका घेत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या बंदमुळे शेतक-यांची गैरसोय होत असून पेरणी हंगामाच्या तोंडावरच हा प्रश्न निर्माण झाल्याने शेतक-यांतून नाराजी व्यक्त होत आहे. यावेळी कृषी दुकानदार संघटनेचे अध्यक्ष बसवराज एरंडे, उपाध्यक्ष विशाल हवा व प्रवीण धुमाळे सचिव वीरभद्र दरेकर, सोमनाथ तांबोळकर, अशोक देवंगरे, सतिश हंद्राळे, गोविंद शिंदे, सुनिल कोरे, बालाजी बिराजदार, दत्ता हिंगमीरे, किरण निला, परमेश्वर ससाने, रामदास झुकले, अलोक महाजन, बालाजी चौसष्ठे, शिवराज भुसनुरे यांचयसह इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

