30.4 C
Latur
Friday, February 13, 2026
Homeराष्ट्रीयकॅ. शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र

कॅ. शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र

सर्वोच्च सैन्य पुरस्काराने होणार गौरव
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आतंरराष्ट्रीय अवकाश केंद्राला भेट दिली होती. या दरम्यान अवकाश संशोधन केंद्रात त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून भारत सरकारने अशोक चक्र हा शांतता काळातील सर्वोच्च सैन्य सन्मान पुरस्कार जाहीर केला आहे.

शुभांशू शुक्ला यांनी २६ जून २०२५ ला नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून स्पेसएक्स या ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात पोहोचत इतिहास निर्माण केला होता. आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन केंद्रात पाऊल ठेवणारे ते पहिले भारतीय अंतराळवीर आहेत तर राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात पोहोचणारे ते दुसरे भारतीय आहेत. राकेश शर्मा ४१ वर्षापूर्वी अंतराळात गेले होते. शुभांशू शुक्ला यांच्याशिवाय गगनयान मिशनसाठी निवडण्यात आलेल्या चार अंतराळवीरांपैकी ग्रुप कॅप्टन पीबी नायर यांना कीर्ती चक्र जाहीर झालं आहे.

शुभांशू शुक्ला १८ दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर होते. १९८४ मध्ये राकेश शर्मा यांनी रशियाच्या सोयूजमधून अंतराळ प्रवास केला होता. फायटर पायलट म्हणून शुक्ला यांच्याकडे एसयू-३० एमकेआय, मिग-२१, मिग-२९, जग्वार, हॉक, डोर्नियर एएफडी अ‍ॅन-३२ सह विविध विमानांच्या २ हजार तासांच्या उड्डाणाचं रेकॉर्ड आहे.

७० जवानांना शौर्य पुरस्कार
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सैन्य दलातील ७० जवानांना शौर्य पुरस्कार देण्यास मान्यता दिली. ज्यामध्ये सहा जणांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार मिळेल. एक अशोक चक्र, तीन कीर्ती चक्र, १३ शौर्य पुरस्कार (एक मरणोत्तर) पुरस्कारांचा समावेश आहे. ४४ शौर्य पुरस्कारांचा समावेश आहे. कीर्ती चक्र पुरस्कार मेजर अर्शदीप सिंग, नायब सुभेदार डोलेश्वर सुब्बा आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर यांना मिळाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR