15.2 C
Latur
Wednesday, November 12, 2025
Homeमहाराष्ट्रकेंद्रीय मार्ड आंदोलनाविषयी मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक

केंद्रीय मार्ड आंदोलनाविषयी मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक

मुंबई : केंद्रीय मार्डने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले तसेच सेन्ट्रल मार्डचे प्रतिनिधी डॉ. सचिन पाटील, डॉ. महेश तिडके, डॉ. कुणाल गोयल आणि डॉ. महेश गुरव उपस्थित होते.

या बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी रहिवासी डॉक्टरांचे विषय, मागण्या आणि मांडलेल्या मुद्दे लक्षपूर्वक ऐकून घेतले. मंत्री मुश्रीफ म्हणाले की, आंदोलनामुळे रुग्णसेवेत व्यत्यय येऊ नये यासाठी त्यांनी सध्या सुरू असलेला संप मागे घ्यावा. तसेच राज्य शासन या मागण्यांवर गांभीर्याने चर्चा करीत असून तातडीने पुढील पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीदरम्यान मंत्री मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी थेट संवाद साधला. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत मुख्यमंत्री महोदयांसोबत मार्डच्या मागण्यांवर लवकरच चर्चा होणार असल्याची माहिती दिली. राज्य शासन व मार्ड यांच्यातील पुढील चर्चेनंतर लवकरच सकारात्मक तोडगा निघेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR