केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान राजीनामा द्या

लातूर : प्रतिनिधी
‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरुन देशातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. या पार्श्वभुमीवर नीट पेपरफुटी विरोधी आंदोलन कृती समिती आणि कॉकरोच जनता पार्टीसह विविध संघटनांच्या वतीने  दि. २० जून रोजी सकाळी १०.३० वाजता शहरातील महात्मा गांधी चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान राजीनामा  द्या…, राजीनामा…, अशा घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनाद्वारे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच नीट पीडित विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये नूकसान भरपाई आणि आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाने करावी, या मागण्यांचाही समावेश होता. या आंदोलनात तरुणांसोबत ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग नोंदवला होता. शासनाच्या शैक्षणिक धोरणावर या वेळी भाष्य करण्यात आले. आंदोलनादरम्यान विद्रोही भगतसिंग कलापथकाच्या वतीने क्रांतिकारी गीतांचे सादरीकरण करण्यात आले. ‘ऐ भगतसिंग तू जिंदा है’ तसेच ‘सांगा आम्हाला बिर्ला-बाटा’ यांसारख्या जनजागृतीपर गीतांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तरुणांच्या या सांस्कृतिक सादरीकरणामुळे आंदोलनाला विशेष ऊर्जाही प्राप्त झाली.
धरणे आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील, शिक्षण तज्ज्ञ रमेश बिरादार, अ‍ॅड. उदय गवारे, कॉ. भोसले, संजय मोरे, रामकुमार रायवाडीकर, शाम वरयाणी, दत्ता सोमवंशी, सोहम कवठेकर, डॉ. बी. आर. पाटील, शिवाजी कांबळे, गणेश कल्लुरकर, संजय व्ययवहारे, अभिषेक शिंदे, इस्माईल सय्यद, नागेश कांबळे, दीपक यादव, मुज्जफर शादुल, प्रयोजन जाधव, आयान सय्यद, हुर्दळे, ओमसाई कांबळे, सतीश हनुमंत, वैभव धोंडगे, देवानंद सोनकांबळे, अरविंद जावध, पृथ्वीराज रविंद्र चव्हाण, गोपाळ चिकाटे, धर्मराज पाटील, बालाजी शिंदे, विठ्ठल माने, एम. व्ही. देशपांंडे, कविश्वर माडिले, ज्योतीराम पवार, वाघंबर उबाळे, दत्ता माळी, मोहसीन खान, वलीसाहेब शेख, याकुब पठाण यांच्यासह असंख्य युवक, नागरिक सहभागी झाले होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|MPSC ऑनलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार
00:30
Video thumbnail
Ramdas Athawale ON Sharad Pawar|शरद पवारांनी NDA मध्ये यावे, स्वागतच करू" – आठवले
11:50
Video thumbnail
Latur|द्रोणा डिफेन्स अकॅडमीविरोधात मनसेचे आंदोलन
03:19
Video thumbnail
Latur Doctar Suicide|डॉ. मेहुल राठोड मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट!
02:49
Video thumbnail
Latur|पिस्तुल्या महाराजाचा पोलीस कोठडीत मुक्काम वाढला!
02:05
Video thumbnail
Nanded|पाण्यासाठी महिलांचा एल्गार; घागर घेऊन ग्रामपंचायतीवर धडक!
00:32
Video thumbnail
Nanded|महिलांची ताकद! वझरा गावात दारूबंदीचा ठराव मंजूर
00:25
Video thumbnail
Nanded|₹1.30 कोटींचा बंधारा... पण लाथ मारताच कोसळला?
02:50
Video thumbnail
Latur|सावकाराने जमीन हडपल्याचा आरोप; शेतकऱ्याचे आमरण उपोषण
04:42
Video thumbnail
Latur|गटप्रवर्तक महिलांचे आशाताई भिसे यांना साकडे
06:36
Video thumbnail
Breaking News|लातुरातील नामांकित डॉक्टरची आत्महत्या! घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल
01:59
Video thumbnail
Big Breaking|धक्कादायक! लातूरचे नामांकित डॉक्टर मेहुल राठोड यांची आत्महत्या
00:30
Video thumbnail
Latur|ग्रामीण आरोग्य व्यवस्था धोक्यात? आशाताई भिसे आक्रमक
04:17
Video thumbnail
Latur|अंजली नगरातील आगग्रस्त घराची आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी
04:41
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16

Latest news