लातूर : प्रतिनिधी
केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा, २०२५ अंतर्गत जिल्हानिहाय निवड यादीतील उमेदवारांच्या मूळ कागदपत्र पडताळणी झाली असून सदर निवड यादी जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर जाहिर केली आहे. या यादीवर उमेदवारांना अक्षेप नोंदवण्यासाठी सोमवार दि. २२ जून हा शेवटचा दिवस आहे.
केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा, २०२५ अंतर्गत जिल्हानिहाय निवड यादीतील उमेदवारांच्या मूळ कागदपत्र पडताळणीसाठी दि. १० जून रोजी निवड यादीच्या २.५ पट यादी प्रसिध्द करुन उपस्थित राहण्याची सुचना देण्यात आली होती. त्यानुसार ९७ उमेदवार उपस्थित झाले होते. अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना द्वितीय (अंतीम संधी) दि. १६ जून रोजी देण्यात आली. २८ पैकी १५ उमेदवार उपस्थित होऊन त्यांची कागदपत्र पडताळणी करण्यात आली. उमेदवारांच्या प्राप्त प्रमाणपत्र पडताळणी नुसार उपस्थित उमेदवारांची पात्र/अपात्र यादी जि.प.च्या संकेतस्थळावर जाहिर करण्यात येत आहे. सदर यादी गट शिक्षणाधिकारी यांनी उमेदवारांच्या निदर्शनास आणुन द्याव्यात. या बाबत विशेष दक्षता घ्यावी. यादी निदर्शनास आल्याची खात्री करावी. यादीवर पात्र, अपात्र बाबत आक्षेप असल्यास योग्य पुराव्यानिशी प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीतील कर्मचा-यांनी कार्यालयात दि. २२ जून रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत सादर करावेत. विहीत मुदतीनंतर आक्षेप/हरकती यांचा विचार केला जाणार नाही, नसल्याचे शिक्षण विभागाने सांगीतले आहे.
केंद्र प्रमुख पदाची सरळ सेवा भर्ती प्रक्रीया
लातूर जिल्हा परिषदेत केंद्र प्रमुखांची पदे पहिल्यांदाच सरळ सेवेने भरली जात आहेत. लातूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १०२ केंद्र प्रमुखांची पदे आसून यातील निम्मे पदे ही पदोन्नतीने तर निम्मे ५१ पदे ही सरळ सेवा भर्ती प्रक्रीयेद्वारे भरली जाणार आहेत. सरळ सेवा भर्ती प्रक्रीयेसाठी टीईटी, सिटीईटी परीक्षा उत्तीर्ण व ६ वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या शिक्षक केंद्र प्रमुखांची पदासाठी पात्र ठरतात. त्यानुसार पात्र ८५० उमेदवारांनी फेब्रुवारी मध्ये केंद्र प्रमुखांची पदासाठी परीक्षा दिली होती. या परीक्षेत उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्यानुसार निवड यादी लावण्यात आली आहे. सदर यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडळातळणी झाली आहे. यादीतील उमेदवारांवर कोणाचे अक्षेप असतील तर त्यांनी अक्षेप नोंदवावेत. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांना वाव मिळणार आसल्याची माहिती लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रमोद पवार यांनी दिली.
















